*बांदा केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी बसस्थानक केले चकचकीत*
*स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी राबविला उपक्रम*
*बांदा*
स्वच्छता ही सेवा या अभियान अंतर्गत महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद पीएम श्री बांदा नं१केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी बांदा येथील सार्वजनिक बसस्थानक परिसराची साफसफाई केली.
सुरवातीला शाळेत महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याचा उलगडा आपल्या भाषणातून केला.यावेळी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींजींच्या जीवन कार्यावर आधारित नाट्यीकटरण सादर केले.यावेळी स्वच्छता विषयक जनजागृती रॅली काढण्यात आली यामध्ये महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांची लक्षवेधी वेशभूषा साकारली होती.
या दिवशी बांदा केंद्र शाळेतील स्काऊट गाईड पथकातील विद्यार्थ्यांमार्फत बांदा येथील सार्वजनिक ठिकाणी असेलेल्या बसस्थानक परिसराची साफसफाई करण्यात आली.या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक शांताराम असनकर स्काऊटर शिक्षक जे.डी.पाटील , पदवीधर शिक्षक उदय सावळ उपशिक्षिका शुभेच्छा सावंत जागृती धुरी, रेश्मा देसाई, सुप्रिया धामापूरकर यांचे मार्गदर्शन लाभले.सेवानिवृत्त विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर यांच्या वतीने यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले