You are currently viewing राष्ट्रवादीची सावंतवाडीत ५ रोजी शिवराज्य यात्रेच आयोजन…

राष्ट्रवादीची सावंतवाडीत ५ रोजी शिवराज्य यात्रेच आयोजन…

राष्ट्रवादीची सावंतवाडीत ५ रोजी शिवराज्य यात्रेच आयोजन…

अमित सामंत ; जयंत पाटील, अमोल कोल्हे, यांच्या उपस्थितीत होणार गांधी चौकात भव्य सभा…

सावंतवाडी

ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी लढवणार त्याठिकाणी शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आले असून त्या निमित्ताने ५ ऑक्टोबर रोजी सावंतवाडी या यात्रेचं आयोजन करण्यात आला असून यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत गांधी चौकात भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान या यात्रेनिमित्त सावंतवाडीत जाणीव जागर यात्रेचा देखील समारंभ होणार असल्याचे माहिती देखील श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सामंत पुढे बोलताना म्हणाले की 16 ऑगस्ट पासून सावंतवाडी मतदारसंघात अर्चना घारे यांनी जाणीव जागर यात्रेच आयोजन करण्यात आले होते .या यात्रेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून यावेळी लोकांमध्ये असलेला केसरकरांन बाबातची नाराजी जनतेने दाखवून दिले त्यामुळे या मात्र संघात जनता आता नक्कीच परिवर्तन करेल व अर्चना घारेंन सारख्या महिला उमेदवाराला जनता निवडून दिल असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान या मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादीलाच मिळणारच असून उर्वरित दोन जागा या शिवसेनेला सोडल्या आहेत.त्यामुळे त्या दोन जागेवर देखील राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे शिवसेनेला मदत करणार असल्याचा देखील सामंत यांनी यावेळी सांगितलं

प्रतिक्रिया व्यक्त करा