You are currently viewing पितृ पक्ष (काकस्पर्श)

पितृ पक्ष (काकस्पर्श)

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पितृ पक्ष*( *काकस्पर्श* )

 

जिवंतपणी आईबापाला

नाही दिला तु आसरा

दुखत्या डोळ्यामध्ये

न घातला, थेंब तु लेकरा

 

पडक्या खोलीत दिला

आईबापासी थारा

श्राद्धाला बोलवतो बाळा

पित्रे सोळा सतरा

 

येता बाळा ताप आईला

नाही केले दवापाणी

गच्चीत आता येऊन बाळा

हाक मारतो दीनवाणी

 

वाटी गुढघ्याची बसवुया

म्हणता तुला बाळा

पैसा नाही आत्ता बाबा

येऊ दया उन्हाळा

 

नवस देवासी केला

तुझ्या साठी बाळा

करता तुला मोठा

हाताचा पाळणा केला

 

नाही घातले खावु कधी

गोडधोड आईबापाला

पक्वाने असतात नाना

आता त्यांच्या श्राद्धाला

 

नको करु आटापिटा

खावु घाल तुझ्या लेकरा

जमल्यास पुढल्या जन्मी

येऊ तुझ्या उदरा

 

आईबापाची न करता

सेवा, सांग बरे बाळा?

काव काव किती करसी

येईन कसा कावळा?

 

*शीला पाटील. चांदवड.*

प्रतिक्रिया व्यक्त करा