You are currently viewing ५ ऑक्टोबरला सावंतवाडीत राजघराण्यातर्फे महाआरोग्य शिबिराचे आयोजन

५ ऑक्टोबरला सावंतवाडीत राजघराण्यातर्फे महाआरोग्य शिबिराचे आयोजन

सावंतवाडी :

 

सावंतवाडीत ५ ऑक्टोबर रोजी शनिवारी श्री पंचम खेमराज महाविद्यालयात महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात तपासणी करणाऱ्या रुग्णांना मोफत औषधांचे वाटपही करण्यात येणार आहे. त्याशिवाय शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असलेल्या रुग्णावर विविध योजना अंतर्गत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिरात विविध रोगांचे १९ तज्ञ डॉक्टर उपस्थित राहून तपासणी करणार आहेत. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष खेम सावंत उर्फ बाळराजे भोसले यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी युवराज लखमराजे भोसले , श्रद्धाराजे भोसले, संस्थेचे संचालक सतीश सावंत, एडवोकेट ,शामराव सावंत ,जयप्रकाश सावंत, प्राचार्य दिलीप भारमल ,डी टी देसाई आदी उपस्थित होते. सावंतवाडीत अशा प्रकारे बेळगाव येथील प्रसिद्ध केएलई रुग्णालयाच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी आणि सिंधूदूर्गतील जनतेला याचा लाभ होणार आहे. केएलई रुग्णालय प्रसिद्ध रुग्णालय आहे. देशभरात या रुग्णालयाचे नाव आहे. या रुग्णालयात आता विविध महाराष्ट्र शासनाच्या योजना रोगांवर उपचार करण्यासाठी उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे या प्रसिद्ध रुग्णालयाचा लाभ रुग्णांना होणार आहे. खेम सावंत बाळराजे भोसले यांनी बेळगाव येथील केएलई रुग्णालयाचे डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्याशी महिनाभरापूर्वी यासंदर्भात चर्चा केली . कोरे यांनी महाविद्यालयामार्फत या शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या. त्याला अनुसरून हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे . या शिबिरात मेंदू रोग ,डायबिटीस ,दंतरोग ,स्त्रीरोग डोळ्याचे विकार ,त्वचा विकार, हाडाचे विकार, यूरोलॉजी आणि नेपोलॉजी ,मानोपचार ,नाक ,घसा ,कान आधी तपासण्या होणार आहेत. तसेच मोफत बीपी,इसीजी इको, ब्लड शुगर चेक सुविधा येथे असणार आहेत . या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा असे आवाहन बाळराजे भोसले यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा