You are currently viewing झुळझुळणारा पाट

झुळझुळणारा पाट

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि.ग.सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*झुळझुळणारा पाट*

******************

हा संथ झुळझुळणारा पाट

शेत दुतर्फी हिरवेहिरवेगार

पखालीतुनी चढवीता पाणी

कुईकुई कुईकुई चालते मोट

 

आडदांड शेतकरी तो गंगाराम

संगे ढवळ्यापवळ्याची जोड

बिनधास्त शेंदते बावडीचे पाणी

त्या खिलारी जोडीला नाही तोड

 

हरित तृणांची मखमल न्यारी

ओलसर घसरडी पाऊलवाट

मंदमंद धुंद पवनस्पर्श धुंदला

समोर डवरली झाडी घनदाट

 

हा निसर्ग जणू स्वनातील झुल

इंद्रधुनूचा तो सप्तरंगलेला थाट

वर्षाऋतूची रिमझीमली चाहूल

आणि खगगणांचा किलबिलाट

 

तृषार्थ , अगतिक ही धरा सुंदरा

निक्षूनी पाहते जलधारांची वाट

नभांगणी जमता घनमेघ सावळे

नदीकिनारी प्रतीक्षेत रमला घाट

**************************

******** *विगसा* *********

प्रतिक्रिया व्यक्त करा