*दर्जेदार व्हिडीओ निर्मिती स्पर्धेमध्ये गणेश नाईक यांना सुयश*
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३ मध्ये कै. रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ चे पदवीधर शिक्षक यांनी तालुका व जिल्हास्तरावर यश संपादन केले आहे.
शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई-साहित्य निर्मितीची चळवळ उभी रहावी यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक/शिक्षक-प्रशिक्षक स्तरावरील शिक्षक, मुख्याध्यापक यांचेसाठी राज्यस्तर दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीची खुल्या स्पर्धेचे शासनामार्फत आयोजित करण्यात आलेली होती.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडियो निर्मिती स्पर्धा २०२३ मध्ये मालवण तालुकास्तरावर गणेश नाईक यांचा १ ली व २ री भाषा गटात तृतीय क्रमांक, १ ली व २ री गणित गटात द्वितीय क्रमांक, ३ री व ५ वी गणित गटात द्वितीय क्रमांक, ३ री व ५ वी परिसर अभ्यास गटात प्रथम क्रमांक आला.
सिंधुदुर्ग जिल्हास्तरावर १ ली व २ री भाषा गटात द्वितीय क्रमांक, १ ली व २ री गणित गटात प्रथम क्रमांक, ३ री व ५ वी गणित गटात प्रथम क्रमांक, ३ री व ५ वी परिसर अभ्यास गटात द्वितीय क्रमांक आला. त्यांचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून अभिनंदन करण्यात आले.