You are currently viewing विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यात यावे

विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यात यावे

– उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

 मुंबई

डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठलोणेरे येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामगार कायद्याच्या नियमानुसार किमान वेतन देण्यात यावेअसे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिले.

            मंत्रालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठलोणेरे अंतर्गत तात्पुरत्या कालावधीकरिता कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

            विद्यापीठामध्ये विविध विभागांतर्गत तात्पुरत्या कालावधीकरीता कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया केली जाते. मात्र या कामगारांना कामगार कायद्याच्या नियमानुसार किमान वेतन दिले जात नाही अशा अनेक तक्रारी शासनाकडे प्राप्त होत आहेत. याची दखल घेऊन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. सामंत यांनी बैठकीत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात आढावा घेतला.

            श्री. सामंत म्हणालेविद्यापीठामध्ये कुशलअर्धकुशलअकुशल गटामध्ये तात्पुरत्या कालावधीकरीता कंत्राटी कर्मचारी आणि कामगार काम करीत असतात त्यांना कामगार कायद्यानुसार वर्गवारीनुसार किमान वेतन मिळाले पाहिजे. मात्र काही विद्यापीठांमध्ये कंत्राटी कामगारांना किमान वेतन दिले जात नाहीत अशा तक्रारी आहेत. विद्यापीठांनी कामगार कायद्यानुसार त्यांना किमान वेतन द्यावेत्यामुळे कामगारांच्या सद्याच्या वेतनापेक्षा किमान 4 ते 5 हजारांनी वाढ होऊन त्यांच्या हक्काचे वेतन मिळेलअसेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

            बैठकीला कामगार विभागाचे आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकरउच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव सतीश तिडकेबाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरु श्री. रामा शास्त्रीकुलसचिव डॉ.बी.एफ.जोगीअधिष्ठाता डॉ. नलबलवारसह सहयोगी अधिष्ठाता डॉ.जोशी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − two =