You are currently viewing भेटशील का परत केव्हा

भेटशील का परत केव्हा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*भेटशील का परत केव्हा*

(नववधू वृत्त)

 

 

मज सांग सख्या भेटशी कधी

त्या नदीकिनारी परत कधी ।ध्रु।।

 

गुजगोष्टी त्या सर्व मनीच्या

भावना किती त्या हृदयीच्या

*शब्दसरी रे त्या शपथांच्या*

करशील का पुरे वचन कधी

त्या नदीकिनारी परत कधी…१

 

 

सुगंध सुमने त्या वनातली

माळलीस तू तीच कुंतली

*श्वासातच मम श्वास तरुतली*

ती थरथर जाणू सहज कधी

त्या नदीकिनारी परत कधी २

 

पानामधुनी थेंब झिरपले

देही माझ्या मग शहारले

*स्पर्श निसटले ओठावरले*

क्षण असाच तो येईल कधी

त्या नदीकिनारी परत कधी ३

 

 

राधिका भांडारकर

प्रतिक्रिया व्यक्त करा