वेंगुर्ल्यात कृत्रिम अवयव, सहाय्यभूत साधनांसाठी ८ रोजी नावनोंदणी*
वेंगुर्ले
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग, अल्मिको व जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ओडीआयपी’ योजने अंतर्गत वेंगुर्ले येथील उपजिल्हा रुग्णालयात मंगळवार ८ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ यावेळेत वेंगुर्ले तालुक्यातील दिव्यांगाना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांसाठी नावनोंदणी करण्यात येणार आहे. दिव्यानाना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांत कृत्रिम हात, पाय, कॅलिपर, कुबडी, काठी, रोलेटर, व्हिलचेअर, ट्रायसायकल, इलेक्ट्रीक ट्रायसायकल, ब्रेल किट, स्मार्ट काठी, स्मार्ट फोन, एमएसआयडी किट, श्रावणयंत्र यांचा समावेश असणार असून दिव्यांगांनुसार त्याचे मोजमाप व नावनोंदणी केली जाणार आहे. या नावनोंदणी शिबिरात नावनोंदणी करतेवेळी संबधितांनी दिव्यांग प्रमाणपत्र, युडीआयडी कार्ड, प्रमाणपत्र रेशनकार्ड, आधारकार्ड, उत्पन्नाचे दिव्यांगत्व दिसेल असे दोन फोटो आदी कागदपत्रे सोबत आणावी. शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.