*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ कवी रा. बा. खानोलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सलाम*
कवितेला सलाम
कविता गुणगुणतात
कविता गातात
…त्यांना सलाम
कविता सांगतात
कविता ऐकतात
….त्यांना सलाम
कविता पाहतात
कविता लिहितात
….त्यांना सलाम
कविता वाचतात
कविता जगतात
….त्यांना सलाम
कविता पेरतात
कविता जोपासतात
….त्यांना सलाम
कविता सादर करतात
कविता निरूपणतात
….त्यांना सलाम
कविता देतात
कविता घेतात
….त्यांना सलाम
कविता लावतात
कविता जगवितात
….त्यांना सलाम
कवितेचा स्वाद
कवितेला दाद
….त्यांना सलाम
रा. बा. खानोलकर, वेंगुर्ला