You are currently viewing राजघराण्याकडून सावंतवाडीत ५ तारखेला “महाआरोग्य शिबिराचे आयोजन – खेम सावंत भोसलें

राजघराण्याकडून सावंतवाडीत ५ तारखेला “महाआरोग्य शिबिराचे आयोजन – खेम सावंत भोसलें

राजघराण्याकडून सावंतवाडीत ५ तारखेला “महाआरोग्य शिबिराचे आयोजन – खेम सावंत भोसलें

तपासणीसह मोफत औषध वाटप करणार…

सावंतवाडी

येथील राजघराणे आणि केएलई सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ऑक्टोबरला येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालय “महाआरोग्य तपासणी शिबिर” आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्रीमंत खेमसावंत भोसले यांनी दिली. दरम्यान या आरोग्य शिबिराला तब्बल १९ विविध प्रकारच्या आजारावर तपासणी होणार असून मोफत औषधे वाटप करण्यात येणार आहे तसेच गरजू रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी महात्मा ज्योतिराव फुले योजनेच्या माध्यमातून सेवा देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी सावंत-भोसले म्हणाले, संस्थानच्या माध्यमातून अनेक वर्ष पासून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर हे महाआरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे. यात हृदयरोग, शस्त्रक्रिया, मेंदू रोग व शस्त्रक्रिया जनरल मेडिसिन जनरल सर्जरी चेस्ट अँड रेस्पिरेटिव्ह मेडिसिन, नाक, कान व घसा दंतरोग शस्त्रक्रिया, फिजिओथेरपी, आयुर्वेद, होमिओपॅथी, हाडांचे विकार व यूरोलॉजी अँड नॅक्रोलॉजी, लहान मुलांचे आजार व शस्त्रक्रिया, गॅस्ट्रोलॉजी, अन्कोलाॅजी, डोळ्यांचे विकार, त्वचा विकार अशा विविध प्रकारचे तपासणी त्या ठिकाणी केली जाणार आहेत. या त्यामध्ये सर्व तपासणी मोफत केली जाणार असून औषधे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. विशेष म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य मेडिकल परतावा व सर्व फायनान्स कंपनीचे इन्शुरन्स आधीच्या माध्यमातून संबंधितांना पुढील सेवा देण्यात येणार आहे. शनिवार ५ ऑक्टोबरला सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ही सेवा उपलब्ध होणार आहे. यासाठी केएफएल संस्थेच्या माध्यमातून दोन सुसज्ज रुग्णवाहिका या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. सावंत यांनी केले.

यावेळी सावंतवाडी संस्थांच्या राणी शुभदादेवी भोसले, युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी श्रद्धा राणी भोसले, अँड. शामराव सावंत, डी. टी. देसाई, प्रा.दिलीप गोडकर, प्राचार्य दिलीप भारमल ,राजेंद्र शिंत्रे, एच. व्ही.ठाकूर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा