*अर्चना घारेंच्या यात्रेतून जाणीवांचा जागर, महिला, युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
सावंतवाडी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून *जाणीव जागर यात्रेच्या* तिसऱ्या टप्प्याला सावंतवाडी तालुक्यात सुरूवात झाली आहे. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यात्रेला मिळत आहे. आमच्या मुलभूत हक्कापासून वंचित ठेवण्याच काम गेली अनेक वर्षे झालेल आहे. त्यामुळे आमच्या जे हक्काच आहे ते आम्हाला प्राप्त झाले पाहिजे असे प्रतिपादन कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे-परब यांनी जाणीव जागर यात्रेवेळी मार्गदर्शन करताना केले.
तालुक्यातील आंबेगाव, कुणकेरी, कोलगाव, तळवडे, न्हावेली, सोनुर्ली, वेत्ये, मळगाव या गावांमध्ये सौ. घारे यांची जाणीव जागर यात्रा पोहचली. या गावांमधील महिला, युवक, ज्येष्ठांकडून यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ग्रामस्थांनी आरोग्य, रोजगार, रस्ते, पूल याबाबत व्यथा मांडल्या. महिला वर्गाने देखील मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. यावेळी महिलांनी आपल्या समस्यांचा पाढा सौ घारे यांच्यासमोर यात्रेदरम्यान वाचला. यावेळी सौ. घारे यांनी, उपस्थितांना मूलभूत हक्कांची जाणीव करून दिली. असंख्य समस्या आपल्यापुढे आहेत. आपल्याला हक्काच्या या गोष्टींपासून वंचित राहावे लागत आहे. हे सगळे आपले मुलभूत हक्क असून हक्काच आहे ते प्राप्त झालेच पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही ही आपल्याला दिलेली शक्ती असून त्यात मोठी ताकद आहे. त्या शक्तीची, त्या ताकदीची जाण ठेवा, ती ताकद स्मरणात ठेवा. तुमच्या हक्काच तुम्हाला प्राप्त करून देणे हाच आपला उद्देश आहे असे प्रतिपादन सौ. अर्चना घारे यांनी यावेळी केले. याप्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी मंत्री प्रविणभाई भोसले, सावंतवाडी तालुकाध्यक्ष श्री. पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष श्री. देवेंद्र टेमकर, विधानसभा महिला अध्यक्ष श्री. नितेशा नाईक, महिला शहराध्यक्ष अँड. सौ.सायली दुभाषी, कोकण विभाग सोशल मीडिया प्रमुख श्री. सचिन पाटकर, सोशल मीडिया सिंधुदुर्ग प्रमुख श्री. संजय भाईप, युवती जिल्हाध्यक्ष सौ. सावली पाटकर, विधानसभा युवक अध्यक्ष विवेक गवस, विधानसभा युवती अध्यक्ष सौ. सुनिता भाईप, युवती तालुकाध्यक्ष सौ.सुधा सावंत, विद्यार्थी अध्यक्ष कु. हृतिक परब, जुहुर खान, याकूब शेख, सिद्धेश तेंडोलकर, बावतीस फर्नांडिस, साईनाथ तानावडे, संजय तानावडे, राजन परब, नामदेव परब, आनंद गावडे, साईनाथ गावडे, तेजस गांवकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते यात्रेला उपस्थित होते.