You are currently viewing राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये १६३ प्रकरणे निकाली

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये १६३ प्रकरणे निकाली

मालवण :

 

मालवण दिवाणी न्यायालय येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मालवण येथील दिवाणी न्याालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी १५ व वादपूर्व प्रकरणांतील १४७ प्रकरणे, तहसील, पोलिसांकडील, वाहतूक शाखेकडील ई-चलन १ प्रकरण अशी मिळून एकूण १६३ प्रकरणे तडजोडीने मिटवून निकाली करण्यात आली. प्रलंबित, वादपूर्व व ई-चलनमधील एकूण रक्कम ७ लाख ५२ हजार ७८२ रुपये झाली आहे. या लोकन्यायालयात मालवण तालुक्यातील वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. पॅनेलप्रमुख म्हणून दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एम. आर. देवकते यांनी काम पाहिले. ॲड. पी. यू. गावकर यांनी पॅनेल सदस्य म्हणून काम पाहिले. न्यायालयाचे कर्मचारी सहाय्यक अधीक्षक एस. एन. पालव, लघुलेखक डी. डी. तिबिले, वरिष्ठ लिपीक यू. एन. मालवणकर, ए. ए. चव्हाण, ए. एस. हळदणकर, एस. व्ही. परब, एल. आर. कांबळी, सी. एम. गोसावी, एस. व्ही. घारे, एस. ए. चव्हाण यांचेही सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा