You are currently viewing अनंत रूपे तुझी

अनंत रूपे तुझी

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*अनंत रूपे तुझी…*

 

विठ्ठला, मायबापा किती किती रूपात तू दर्शन दिलेस…

विचार करताना ….तुला आठवताना ..तुला समजून. घेताना तू विश्व व्यापूनही भक्तांच्या र्हुदयी माऊलीच्या रूपात स्थानापन्न झाला आहेस. इतकंच कळलं

देवकी चा सुपूत्र म्हणुन बाळरूपात तिने एकदाच व शेवटचे पाहिले.

वसुदेवाच्या टोपलीत बसुन आपल्या बाळपावलांनी यमुनेच्या पूराला कापत नंदाघरी पोचलेले तान्हेरूप आपल्या खोड्यांनी भंडाऊन सोडणारा गोप गोपींना छळणार्या दहीलोणी चोरून मटकावणारे ,”कान्हा रूप “,राधेला वेडाऊन सोडणारे,गायीगुरांना आपल्या. वेणूनादाने मंत्रमुग्ध करणारे मुरलीधराचे रुप, कालिया ला मारणारे विक्राळरूप,गोकूळवासियांची संकटातुन सुटका करणारे गोवर्धन ऊचलणारा श्री क्रिष्णाचे रुप ,असे हवेहवेसे वाटणारे गोकूळीचे घननीळ राजबिंडे राजस लोभस रुप जनाजनात अजरामर झालंय

पुढे तूझे क्षत्रिय रूप,जे राजधर्म, प्रजापालक हा क्षत्रिय धर्म पालन करणारे द्वारकाधीशहे रूप. यासाठी तू नंद यशोदा गोकुळ आणि राधा यांचा विलाप न ऐकल्यासारखा करत मन खंबीर करत द्वारकेला पोचलास

महाभारतात पांडवांचा सल्लागार झालास द्रौपदीसाठी पाठीराखा बंधू आणि धर्मासाठी च्या युद्धात. अर्जूनाचा सारथी सुद्धा झालास किती सुंदर रूपात तू दर्शन देत होतास?

आप्तांना रणांगणात बघताना धीर.सुटलेल्या अर्जुनाला ऊपदेश करणारे धीर देणारे तुझे रूप भगवत् गीतेच्या रूपात अढळ पदावर विराजमान झाले .

लक्षलक्ष तुझे भक्त निरपेक्ष निस्वार्थी भक्ती त दंग झाले .घरसंसार विसरले.तुला त्यांनी मायबापा म्हणून च साद घातली आणि तु भक्ती त विरघळत एकरूप होत गेलास भक्तांच्या सुखदुःखात रमलास .त्यासाठी गोरोबाच्या घरी कुंभार रूप, चोखोबासाठी कष्टकरी, जनाईकरता जात्यावर दळणारे ..गोवर्या थापणारे रूप, सावतासाठी मळ्यात भाजी पिकवणारे शेतकरी रूप कबीरासाठी विणकराचे रुप ,कुंभारिचे रुप …किती किती रूपे ही तुझी केवळ भक्तांच्या साठी?

सर्वात सुंदर रुप तुझे होते महाराघरी प्रसन्न मनानी जेवणारे महाररूप …अक्षरशः आपल्या भक्तासाठी …झाला महार पंढरी नाथ ..।

मीराबाई ला दिलेले.विष तर तूच प्यायलास आणि सावळा घनश्याम घननीळ झालास .तुझे राजस सुकूमार राजबिंडे रूफ तू विसरलास.

म हाराष्ट्रातील तुझे विठ्ठल रूप तर कर्नाटकात तू कानडा राजा .

अभंगात तू पंढरीनाथ संतासाठी मायमाऊलीचे रूप .

खरंच देवा, बघावे तिकडे त्या वेळी भक्तांच्या साठी नवे नवे रूप दाखवत राहिलात .अनंत रूपात दर्शन देत विश्वच व्यापुन टाकलेत .लक्षलक्ष भक्तांच्या र्हदयात सामाऊन राहिलात तरीही दशांगुळे ऊरलात.

युगे सरली, काळ लोटला, आता फक्त पुंडलिकाचे नगर पंढरपुरी मुक्काम केलात. रूक्मिणी सह भक्तांचे मायबाप माऊली झालात .

हेच तुमचे रुप भक्तांना ओढ लावते आणि तुम्हाला भेटायला त्यांच्या माहेरी वारी करतात. वारकरी होऊन गळा मिठीसाश्रुनयनांनी मारतात. त्रुप्त होतात.

आयुष्याच्या संध्याकाळी समोर.पैलतीर दिसतो आहे, संध्याछाया भिववत आहेत अशावेळी कातर झालेल्या मनांना हात धरून. मायेने.पैलतीरावर पोचवणारे हे मायरुप……. मातृ हृदयाची विठाई..। हेच तुमचे शाश्वत रुप मनामनी जनमानसात अखंड रूजलेले आहे .

 

….।।…।ः.।….।..

अनुराधा जोशी, अंधेरी मुंबई.

प्रतिक्रिया व्यक्त करा