*’डॉ. प्रभाकर मांडे हे लोकसंस्कृतीमधील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व’ : राष्ट्रीय चर्चासत्रातील प्रतिपादन*
पिंपरी
‘पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे हे लोकसंस्कृतीमधील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते’ असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (भारतीय लोककला अभ्यास संशोधन व कल्याण केंद्र आणि भाषा व साहित्य प्रशाला) आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रातील संपन्न झालेल्या सात सत्रांच्या माध्यमातून
पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे यांच्या साहित्यलेखन, संशोधन आणि सामाजिक – सांस्कृतिक योगदानाचे सिंहावलोकन करताना सहभागी मान्यवरांकडून
शनिवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात आले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह ॲड. सतिश गोरडे, समन्वयक प्रा. डॉ. धनंजय भिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सत्रानंतर डॉ. प्रभाकर मांडे यांची लोकरंगभूमी मीमांसा’ या परिसंवादात डॉ. प्रकाश खांडगे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. अशोक लिंबेकर, डॉ. प्रवीण भोळे, रवींद्र गोळे, महादेव गायकवाड यांनी लोकरंगभूमीविषयी ऊहापोह केला. प्रज्ञा फुलपगार यांनी सत्राचे सूत्रसंचालन केले. संकेत संभेराव यांनी सत्राचे आभार मानले.
डॉ. संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ‘डॉ. प्रभाकर मांडे यांचे मौखिक वाड्.मय परंपराविषयक लेखन’ या परिसंवादात श्रीकांत चौगुले, डॉ. धनंजय भिसे, अश्विनी बाविस्कर, स्वप्ना झिरंगे यांनी डॉ. मांडे लिखित ग्रंथांवर भाष्य केले. वर्षा जाधव यांनी सूत्रसंचालन केले; तर नितीन बारणे यांनी आभार मानले.
प्रसेनजीत फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काशिनाथ पवार, डॉ. विनायक लष्कर, गौरी डोखळे, अरुणा साबळे यांनी ‘डॉ. मांडे यांचे गावगाड्याबाहेरील समाज व लोकमानसविषयक आकलन’ या विषयावर ऊहापोह केला.
डॉ. प्रभाकर मांडे यांची लोकसाहित्य, लोकपरंपरा आणि लोकमानस संकल्पना’ या परिसंवादात डॉ. श्यामा घोणसे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. सुभाष आहेर, रूपाली भुसारी, सुनंदा भगत यांनी डॉ. मांडे लिखित विविध ग्रंथांवर भाष्य केले.
डॉ. प्रभाकर मांडे यांच्या सर्वागीण व्यक्तिमत्त्वाचा वेध प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून घेण्यात आला. त्यासाठी मांडे यांचे तरुण काळातील प्राध्यापक स्नेही अन् कालांतराने झालेले व्याही प्रा. प्रभाकर देव तसेच मांडे यांच्या स्नुषा अन् शिष्या वृषाली मांडे यांच्याशी गिरीश प्रभुणे आणि रवींद्र गोळे यांनी सुसंवाद साधला. पूर्वग्रह न बाळगता केलेले अफाट वाचन, दांडगा जनसंपर्क, लोकसंस्कृतीचा साक्षेपी धांडोळा घेणारा संशोधक, सुमारे ५२ ग्रंथांचे लेखन करणारा सिद्धहस्त साहित्यिक, कुटुंबातील प्रेमळ कर्ता पुरुष आणि जगन्मित्र असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू श्रोत्यांसमोर उलगडत गेले. दरम्यान सुप्रसिद्ध नर्तक पंडित नंदकिशोर कपोते यांना सन्मानित करण्यात आले.
सातव्या सत्रात सोमनाथपूर, तालुका उदगीर, जिल्हा लातूर येथील श्री जगदंब कलापथकातील शाहीर रतिकांत घोगरे, शाहीर लक्ष्मण बनसोडे, शाहीर सत्यवान मदने, शाहीर विशाल घोडके यांनी डॉ. प्रभाकर मांडे यांना शाहिरी जलशाच्या माध्यमातून अभिवादन केले. संजय पांचगे (संबळ) आणि ओंकार शिंदे (ढोलकी) यांनी साथसंगत केली.
पूनम गुजर, अतुल आडे, मारुती वाघमारे, समर्थ डोंगरे,
सतीश अवचार यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रा. डॉ. धनंजय भिसे यांनी आभार मानले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
______________________________
*संवाद मीडिया*
🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡
*प्रॉपर्टी विकणे आहे*
*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*
https://sanwadmedia.com/148054/
*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*
*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*
*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*
*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*
*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈
*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*
*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*🔍
*जाहिरात लिंक*
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*