You are currently viewing जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत भोसले स्कूलची सानिका नाईक प्रथम

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत भोसले स्कूलची सानिका नाईक प्रथम

_*जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत भोसले स्कूलची सानिका नाईक प्रथम ….*_

_*ओघवत्या वक्तृत्व शैलीने जिंकली उपस्थितांची मने….*_

_सावंतवाडी

_सावंतवाडी तालुका माध्यमिक अध्यापक संघ आयोजित आणि जि.प.चे माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ शंकर पेडणेकर पुरस्कृत जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धा आज रोजी नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली येथे पार पडली._
_या स्पर्धेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलची सहावीतील विद्यार्थिनी सानिका आत्माराम नाईक हिने ‘पर्यावरण संरक्षण – माझी जबाबदारी’ या विषयावर ओघवत्या शैलीत वक्तृत्व सादर करून उपस्थित लोकांची व परीक्षकांची मने जिंकली. तिला पाचवी ते सातवी या गटात प्रथम क्रमांक प्राप्त झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन तिला गौरविण्यात आले._
_शाळेच्या शिक्षिका संपदा राऊळ यांचे तिला मार्गदर्शन लाभले. सानिकाने मिळविलेल्या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंत भोसले व मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी तिचे अभिनंदन केले._

प्रतिक्रिया व्यक्त करा