You are currently viewing कास्ट्राईब राज्य शिक्षक संघटनेच्या वतीने जे.डी.पाटील यांचा सन्मान

कास्ट्राईब राज्य शिक्षक संघटनेच्या वतीने जे.डी.पाटील यांचा सन्मान

*कास्ट्राईब राज्य शिक्षक संघटनेच्या वतीने जे.डी.पाटील यांचा सन्मान*

*बांदा*

कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत महाराष्ट्र राज्य शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त पी एम श्री बांदा केंद्र शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री जे.डी.पाटील यांचा राज्य संघटनेच्या वतीने महात्मा जोतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
सावंतवाडी येथील नवसरणी केंद्र येथे शालेय शिक्षण मंत्री दिपकभाई केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत कोकण पदवीधर मतदारसंघाचे विधानपरिषदेचे आमदार निरंजन डावखरे , कास्ट्राईब संघटनेचे राज्य अध्यक्ष आकाश तांबे,राज्य सरचिटणीस रविंद्र पालवे, कार्याध्यक्ष किरण मानकर आदि मान्यवरांच्या उपस्थितीत जे.डीपाटील यांचा शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. जे.डी.पाटील‌ यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल‌ सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा