You are currently viewing आकेरी येथील अपघातात पिंगुळी मधील युवकाचा मृत्यू

आकेरी येथील अपघातात पिंगुळी मधील युवकाचा मृत्यू

आकेरी येथील अपघातात पिंगुळी मधील युवकाचा मृत्यू

कुडाळ

आकेरी येथील जुनी कोका कोला कंपनी समोरील रस्त्यावर मोटरसायकल घसरून झालेल्या अपघातात पिंगुळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील २१ वर्षीय किशन केशव पिंगुळकर हा युवक अपघातात ठार झाला. तर मोटरसायकलवरील श्रीराम पांडुरंग केळुसकर हे जखमी झाले आहेत. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे. पिंगुळी ग्रामपंचायत सदस्य केशव पिंगुळकर यांचा तो मुलगा होत.

पिंगुळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील किशन पिंगुळकर व श्रीराम केळुसकर हे दोघेही होंडा लिवा दुचाकी गाडी नंबर (एमएच- ०७ – एइ- २०१९) वरून कोलगाव सावंतवाडी येथून पिंगुळीच्या दिशेने येत असताना आकेरी येथील जुनी कोका कोला कंपनी समोरील रस्त्यावर मोटरसायकल घसरली आणि यामध्ये मोटरसायकल स्वार किशन पिंगुळकर हा गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. तर मोटरसायकलवरील श्रीराम केळुसकर हे जखमी झाले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताचा तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भांड हे करीत आहेत

प्रतिक्रिया व्यक्त करा