*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुदलवार लिखित अप्रतिम हायकू काव्यरचना*
*गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांना त्रिवार अभिवादन!!*
*स्वरलता*
ही स्वरलता
नादब्रम्ह स्वरुप
स्वर्गीय गाता!
स्वर माधुरी
रेशीम धागे जणू
आश्चर्य म्हणू!
आर्त ते सूर
तरल तेच भाव
ह्रदयी ठाव!
आमुचे पुण्य
त्या गानकोकीळेचे
सौख्य गीताचे!
स्वर विहार
सदैव ऐकलेला
मनी वसला!!
गानकोकीळा
आहे अजरामर
गीतबहर!!
*****💐💐🙏💐💐***
अरुणा दुद्दलवार✍️
यवतमाळ