You are currently viewing लेखणी मुद्रण

लेखणी मुद्रण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”लेखणी मुद्रण”*

 

लेखणी दावी अंतरंग अद्भूत

भाव प्रकटतात लेखणींतून।। धृ।।

 

कधी शोध कधी असते बोधप्रद

कधी रडवते अन् कधी हसवीतं

तलवार होते घुसते काळजात।।1।।

 

कधी कोमल जहाल करी प्रहार

कधी येते अंगावर कधी गहिवर

वाटे आधार घेऊन जाते स्वप्नांत।।2।।

 

एकेक ठिपक्यांचे बनते अक्षर

अक्षरांचा समूह बनतो शब्द

मूक सुचवते बोलण्या पल्याड।।3।।

 

लेखन संस्कृती आहे कला विज्ञान

लिहिताना टाळावे कटू अपशब्द

पारदर्शकता करी अंतर्मुख मन।।4।।

 

लिहिणाऱ्याला असते मुक्ती स्वातंत्र्य

लिहावयास लागतो पाया सुस्थित

विचारांची मांडणी उतरते शब्दांत।।5।।

 

नाही माघार लेखणीला ओघ स्त्रोत

पुरावा राहतो लिहिल्यान शाबूत

लेखन मुद्रण आहे अलौकिक नातं।।6।।

 

झाले विकसीत मुद्रण तंत्रज्ञान

कमाल केली टंखलेखन यंत्रानं

कागदावर होते साहित्य मुद्रितII7II

 

श्री अरुण गांगल. कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा