You are currently viewing बिनफुलाचं ब्रिटिश झाड…..!!

बिनफुलाचं ब्रिटिश झाड…..!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*बिनफुलाचं ब्रिटिश झाड…..!!*

 

बिनफुलाचं झाडं रेंगाळत

आजही घराच्या कोप -यावर

तुसड्यापरी बोलतं माझ्याशी

जगतं आभाळाच्या तुकड्यावर..

 

ब्रिटिश राजवट गेली

झाडाला ठाऊक नाही

त्यांचचं गुणगान गात

आजही फुलत नाही..

 

कवेत सुर्याला घेतघेत

रोजच माझ्यावर हसतं

चोचले तुझे पुरेकरं

सावलीनं गुलाबांना छळतं

 

जमेलं..तसं..जगून घे

कितीकाळ अजून जगणार

ब्रिटिश सोडून गेलेत

मी..इथेचं..राहणारं..

 

बाग तुझी म्हातारी

कोण तिला सांभाळणार

वयाविना जगणं जमत..तुला

कितीकाळं अंगणात लपणार..

 

गुलामी दिडशेवर्ष भोगलीस

झूल अंगावरून उतरवं

परदेशीच गुलांब …..तुझे

नकोचं शब्दांची जमवाजमवं

 

सांग जगाला ओरडून

अजूनही गुलामगिरीतचं जगतो

तुझ्या मातीत उगवलेल्या

गुलाबांना स्वदेशी मानतो..

 

बिनफुलाचं ब्रिटिश झाडं

कोरड्या तुच्छभावानं बघतं

मीच गप्प बसतो..कलगीतुरा नकोचं

परदेशी कंटकाचं फावतं..

 

बाबा ठाकूर धन्यवाद

प्रतिक्रिया व्यक्त करा