*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला सहस्त्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*षड् रिपु…*
षड्रीपुंनी भरलेला माझा,
मोहघडा हा शिरावरी!
अडखळत पाऊल पडते,
कधी डचमळते या उरी!….१
कधी वाटते ओतून द्यावे,
मोहाचे क्षणभंगुर पाणी!
कधी मनी ही भरून राहती,
मद मोहाची मोहक गाणी!….२
काम, क्रोध, भय, मत्सर सारे,
सतत मानवा मनी छळती!
मिळेल कधी का सुटका त्यातून,
प्रार्थीते ईश्वरा माझी मती!…३
या फेऱ्यातून सुटका नाही,
प्रयत्न करावा परी साचा!
तुज भक्ती विण हाती न काही,
सार्थकी लावू जन्म मानवाचा!
उज्वला सहस्रबुद्धे, पुणे