You are currently viewing एमटीडीसीच्या इसदा, तारकर्ली येथे पर्यटन दिन उत्साहात साजरा…

एमटीडीसीच्या इसदा, तारकर्ली येथे पर्यटन दिन उत्साहात साजरा…

एमटीडीसीच्या इसदा, तारकर्ली येथे पर्यटन दिन उत्साहात साजरा…

मालवण
एमटीडीसीच्या इसदा, तारकर्ली येथे पर्यटन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पर्यटन महामंडळाच्या आरमार बोट सफारीचे उद्घाटन एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

यानिमित्ताने सूर्यवंशी यांनी जागतिक पर्यटन दिनाचे महत्त्व अधोरेखित करत सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवत त्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमात आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देखील सूर्यवंशी यांच्या हस्ते वितरित करण्यात आली. यंदाच्या चित्रकला स्पर्धेची थीम पाण्याखालील पर्यटन ही होती. विशेष म्हणजे, लहान मुलांमध्ये देखील पाण्याखालील पर्यटनाविषयी जागरूकता दिसून आली, जी एमटीडीसीच्या स्कुबा प्रकल्पाच्या यशाचे प्रतिक आहे. या स्पर्धेचे परीक्षण ए आर जाधव यांनी केले यावेळी सूर्यवंशीयांच्या हस्ते कल्पवृक्षाचे वृक्षारोपण देखील करण्यात आले, ज्यामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला गेला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इसादा चे व्यवस्थापक सूरज भोसले, आणि इसदा कर्मचारीवर्ग यांनी उत्कृष्ट कार्य केले. कार्यक्रमाला आलेल्या उपस्थितांनी श्री. सूर्यवंशी यांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा