You are currently viewing विशाल परब यांनी जनतेचे मानले आभार..

विशाल परब यांनी जनतेचे मानले आभार..

सावंतवाडी :

 

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. याप्रसंगी विशाल परब यांनी नागरिकांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढविल्याबद्दल तमाम सावंतवाडी मतदारसंघातील जनतेचे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

मतदार संघात रुग्णवाहिका वाटप करून मी पुण्याचे काम केले आहे. माझ्या या कामामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचतील आणि त्यांचा आशीर्वाद माझ्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांना मिळेल हेच माझे समाजकारणातील यश आहे असे मत भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केले. दरम्यान काही लोकांनी कार्यक्रमाला एवढा मोठा खर्च का ? दिखाऊपणा कशासाठी ? असा सवाल केला काही लोक माझ्या जीवावर उठली आहेत. मला धमक्या देत आहेत. माझी नाहक बदनामी करून मला त्रास देण्याचा प्रयत्न केला. मात्र काही झाले तरी मी त्याच ताकदीने पक्षासाठी आणि जिल्ह्यातील जनतेसाठी काम करणार आहे. काही झाले तरी टीका करणार नाही असे परब यांनी म्हटले.

मी दहा वर्षे पूर्वी समाजकारणात वावरत असताना माणगाव खोऱ्यामध्ये एक रुग्णवाहिका घेतली होती त्याचा फायदा तब्बल दोन हजारहून अधिक रुग्णांना झाला. त्या दोन हजार रुग्णांच्या कुटुंबांना आनंद मी देऊ शकलो याचा मला आनंद आहे. हाच उद्देश ठेवून मी भाजपच्या माध्यमातून रुग्णवाहिका लोकार्पण करण्याचा निर्णय घेतला. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे वाढदिवसानिमित्ताने हा उपक्रम मी राबवत आहे. समाजकारण करण्याची भाजपची शिकवण आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी माझी वाटचाल प्रामाणिकपणे करत आहे. परंतु मला काही लोकांकडून त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र काही झाले तरी मी कोणाला प्रत्युत्तर देणार नाही. आजचा कार्यक्रम होऊ नये म्हणून काही लोकांनी प्रयत्न केला. वरुण राजाला सुद्धा फोन लावला परंतु पाऊस काही आला नाही आणि कार्यक्रम यशस्वी झाला असाही त्यांनी विरोधकांना चिमटा काढला.

यावेळी परब यांनी पालकमंत्री चव्हाण यांचे कौतुक केले. पालकमंत्री कायम पाठीशी राहिल्यामुळे मी समाजाभिमुख उपक्रम राबवू शकलो. याचा मला आनंद आहे. यापुढे अशाच प्रकारे सामाजिक कार्यक्रम राबवण्याचा माझा मानस आहे त्यासाठी जनतेने माझ्या पाठीशी राहावे असे आवाहन परब यांनी कार्यक्रमात केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा