You are currently viewing सावंतवाडीत २९ सप्टेंबरला शिक्षण परिषदेचे आयोजन….

सावंतवाडीत २९ सप्टेंबरला शिक्षण परिषदेचे आयोजन….

सावंतवाडीत २९ सप्टेंबरला शिक्षण परिषदेचे आयोजन….

सावंतवाडी

येथे कास्ट्राईब शिक्षण संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने २९ सप्टेंबरला येथील नवसरणी सभागृहामध्ये सकाळी १०.०० ते संध्याकाळी ०५.०० या कालावधीत शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेसाठी कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या परिषदेत शैक्षणिक विषयांवर चर्चा केली जाणार आहे. तसेच या परिषदेत महात्मा जोतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार, फातिमा शेख आदर्श शिक्षिका पुरस्कार, मौलाना आझाद आदर्श शिक्षक पुरस्कार आदी पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहेत.

यावेळी महेश चोथे, शिक्षण उपसंचालक प्रदीप कुडाळकर, शिक्षणाधिकारी योजना, डाएट सिंधुदुर्ग प्राचार्य राजेंद्र कांबळे , शिक्षक संघटना अध्यक्ष मधुकर काठोळे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ नेते संभाजी थोरात, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हाध्यक्ष भरत केसरकर , सिंधुदुर्ग मुख्याध्यापक संघ अध्यक्ष वामन तर्फे , प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग अध्यक्ष विठ्ठल गवस, शिक्षक भारती सिंधुदुर्ग अध्यक्ष संजय वेतुरेकर , सावंतवाडी गटशिक्षणाधिकारी श्रीम. कल्पना बोडके, मालवण गटशिक्षणाधिकारी संजय माने , शिक्षकेतर कर्मचारी जिल्हाध्यक्ष अनिल राणे , कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष दिलीप शितोळे , दोडामार्ग गटशिक्षणाधिकारी निसार एम नदाफ, दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग अध्यक्ष आनंद तांबे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी या परिषदेसाठी शिक्षक तसेच पालक यांनी मोठे संख्येत उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे राज्य अध्यक्ष आकाश तांबे यांनी पत्रकार परिषदेत केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा