राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांची माझी भेट त्यांच्या विद्यापीठातील कार्यालयात झाली. ताबडतोब निर्णय करणारा एक कुलगुरू म्हणून त्यांनी त्यांच्या कार्याचा परिचय दिला. आम्हाला मिशन आयएएस हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात राबवायचे होते.. नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी यांनी नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यामध्ये मिशन आय ए एस राबविण्यात रितसर परवानगी दिली होती. त्यांनी तसे लेखी आदेश नागपूर जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा यांना दिले होते.. शाळा समवेतच हा उपक्रम महाविद्यालयात राबवावा यासाठी आम्ही कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांना भेटलो.. खरं म्हणजे कुलगुरू कामातच होते. त्यांच्या सभोवताली अधिकाऱ्यांचा व प्राध्यापकांचा गराडा होता . पण आम्ही अमरावतीहून आलो हे कळल्यानंतर त्यांनी आम्हाला लगेच आत मध्ये बोलावले. योगायोगाने नागपूरचे आमदार श्री अभिजीत वंजारी सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक रमेश पिसे हे पण आमच्याबरोबर कुलगुरू कक्षात आले.. माझ्याबरोबर असलेले मिशन आयएएस चे नागपूरची धुरा सांभाळणारे श्री अनिल मोहोड श्री राजेश मोहोड कर्नल राजू पाटील श्री संजय सवाई थूल यांची मी कुलगुरूंना ओळख करून दिली. स्पर्धा परीक्षा कार्यशाळा हा उपक्रम आम्ही राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात राबवू इच्छितो यासाठी आम्ही त्यांना रिटसर लेखी पत्र दिले.. मिशन आयएएस ची भूमिका आम्ही त्यांना समजावून सांगितली. त्यांना खूपच आनंद झाला. मी देखील तुमच्या एखाद्या स्पर्धा परीक्षा कार्यशाळेला आवर्जून उपस्थित राहील असे त्यांनी आम्हाला सांगितले आणि त्यांनी लगेच सहाय्यक कुलसचिवांना बोलावले. आणि राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे सर्व महाविद्यालयांना लेखी आदेश देण्याची सूचना केली. कुलगुरूंचा आदेश असल्यावर आम्हाला नागपूर विद्यापीठात हा उपक्रम राबवणे सुलभ झाले.. आज नागपूर विद्यापीठातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत तरबेज होत आहेत याचे काही श्रेय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांना द्यावे लागेल.. त्यांनी ताबडतोब निर्णय घेतला नसता किंवा आम्हाला उद्या या असे म्हटले असते तर कदाचित हा योग घडून आला नसता. पण त्यांच्याजवळ दृष्टी होती आणि म्हणूनच आम्ही बाहेर गावावरून आलो आहे त्याची जाणीव ठेवून त्यांनी आम्हाला लगेच वेळ देऊन सहाय्यक सचिवांना आम्हाला रितसर लेखी पत्र देण्याची सूचना केली.. कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी सरांची ही आठवण आमच्या कायमची लक्षात राहील. रहे ना रहे हम महका करेंगे असेच म्हणावे लागेल….!
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक
डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी
अमरावती कॅम्प..
9890967003