You are currently viewing धूम्रवर्ण

धूम्रवर्ण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा गझल मंथन, गझल प्राविण्य समूहाच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री शोभा वागळे लिखित अप्रतिम लेख*

 

*धूम्रवर्ण*

 

आपले सर्वांचे लाडके गणपती बाप्पा ह्यांची बारा नावांनी नारदांनी रचिलेले स्तोत्र आपण सगळे जण म्हणत असतो.त्या स्तोत्रा नुसार गणपतीचे आठवे रूप धूम्रवर्ण हे गणपतीला का घ्यावे लागले त्याची ही कथा धूम्रवर्ण-

लोक पितामहाने सहस्त्रांशुला कर्मराज्याच्या अधिपती पदावर नियुक्त केले. राज्यपद प्राप्त झाल्यावर सूर्यदेवाच्या मनात अहंकार उत्पन्न झाला. ते विचार करू लागले की, ‘कर्माच्या प्रभावाने पितामह सृष्टीची रचना करतात, कर्मामुळेच विष्णू जगताचे पालन करतात, कर्माद्वारे शिवसंहार समर्थ आहे. संपूर्ण जग कर्माधीन आहे आणि मी त्यांचा संचालक आहे. सर्वजण माझ्या अधीन आहेत’. असा विचार करता करता त्यांना शिंक आली आणि त्या शिंकेमधून एक महाकाय पुरूष उत्पन्न झाला व तो पुरुष दैत्यगुरू शुक्राचार्याकडे गेला. तेव्हा शुक्राचार्यांनी त्याला परिचय विचारला असता त्याने सांगितले की माझा जन्म सूर्यदेवाच्या शिंकेपासून झाला आहे. मी अनाथ व अनाश्रित असून मला तुम्ही आश्रय द्या. आपल्या प्रत्येक आज्ञेचे मी पालन करीन.

त्याचे म्हणणे ऐकून शुक्राचार्य थोडा वेळ ध्यानग्रस्त झाले. थोढ्या वेळाने ध्यानातून ते जागे झाले व त्या महाकाय पुरुषाला म्हणाले ‘तुझा जन्म सूर्याच्या अहंभावामुळे झाला आहे म्हणून तुझे नाव ‘अहम’ असे ठेवण्यात येत आहे. तू तपस्या करून शक्ती प्राप्त कर असे सांगून दैत्यगुरू शुक्राचार्यानी त्याला गणेशाचा ‘षोडाशाक्षर मंत्र’ आणि जप विधी करण्यास सांगितले.

अहम् जंगलात जाऊन उपवास करत गणेशमंत्राचा जप करू लागला. त्याची कठोर तपस्या पाहून प्रत्यक्षात मूषक वाहन, गजानन, त्रिनेत्र, एकदंत प्रकट झाले. गणेश प्रसन्न होऊन आपल्या समोर पाहून त्याने प्रणाम केला. संतुष्ट होऊन लंबोदर त्याला म्हणाले, ‘मी तुझे तप आणि स्तवन पाहून प्रसन्न झालो. तुला जो वर मागायचा असेल तो वर मला माग!’.

अहम् ने प्रभूला हात जोडून ब्रम्हांडाचे राज्य आणि आरोग्याचा वर मागितला. गणपतीनेही, ‘तथास्तू’ म्हणाले व अंतर्धान पावले.

अहम् वर प्राप्त झाल्याच्या आनंदाने आपल्या गुरूकडे गेला.

गुरू शुक्राचार्यांनी त्याचे कौतुक केले व त्याला दैत्यधीशपदी नियुक्त केले. त्याने तिथे मग विषयप्रिय नावाचे एक असुरांचे सुंदर नगर निर्माण केले. अहम् तिथेच असुरांबरोबर राहू लागला. नंतर काही वर्षात त्याचे प्रमादासुराची कन्या ‘ममताशी’ त्याचा विवाह ही झाला. काही महिन्यांनी त्याला गर्व आणि श्रेष्ठ नावाचे दोन मुलगेही झाले.

प्रमादासुर, त्याच्या सासऱ्यानी अहम् ला ब्रह्मांडावर विजय प्राप्त करून सुख उपभोगायचे कला सांगितली.. अहम् ला आपल्या सासर्‍याचे म्हणणे पटल्यावर अहम् आपल्या दैत्य गुरू शुक्राचार्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्या सैन्यासह विजयी घोडदौड सुरू केली.

लढाईत तो एक एक जिंकत गेला. त्याचा अहम् दिवसे दिवस वाढतच चालला. त्याने पाताळावरही आक्रमण केले. परम प्रतापी अहंतासुराच्या भीतीपोटी शेषाने त्याला कर देण्यास सुरवात केली. नंतर स्वर्गावर आक्रमण केले विष्णूला असुरांच्या अमोघास्त्रासमोर पराभूत व्हावे लागले. सर्वत्र अहंकासुराचे अधिपत्य झाले होते. देव, ऋषी जंगलात लपून राहत होते. अहंतासुर मद्य आणि मांस सेवन करत होता. त्याचा विक्षिप्तपणा खूप वाढला होता. तो मनुष्य, नाग आणि देवतांच्या कन्यांवर बलात्कार, अपहरण करून त्यांचे शीलहरण करू लागला. त्याच्या अशा कृत्यामुळे सगळीकडे पापाचे राज्य निर्माण झाले होते. जंगलात लपलेल्या देवता, ऋषी यांचे यज्ञ तो मोडून काढू लागला. तसेच जंगल नष्ट करण्याचा आदेश त्याने दिला. त्यामुळे देवता, ऋषी, मनुष्य सर्वजण भयभीत झाले. मंदिरामध्ये सुद्धा देवाच्या जागी असुरांच्याच मूर्ती बसविण्याचे आदेश देवून अंमलात आणले जाऊ लागले होते.

अहम् च्या अशा भयानक त्रासाला कंटाळून ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांनी एकत्र येऊन गणेशाची आराधना करण्यास सुरवात केली. त्यांची आराधना पाहून धूम्रवर्णगणेशाचे आठवे रूप प्रकट झाले. सर्व देव देवतांनी धूर्मवर्णाना प्रणाम केला आणि अहंतासुराच्या अत्याचाराची हकीगत सांगून त्याच्या त्रासापासून मुक्ती देण्याची विनंती केली.

दुसर्‍या दिवशी रात्री धूम्रवर्ण श्री गणेशाचे आठवे रूप धुरकट रंगाचे अक्राळ विक्राळ भयानक असे. त्याच्या एका हातात

भीषण पाश ज्यांत भयंकर अग्नी ज्वाळा उसळत होत्या.अतिशय भयानक असे धूर्मवर्ण रूप होते. अशा अवतारात धूर्मवर्ण त्या अहंतासुराच्या स्वप्नात गेलाव त्याने आपल्या दिव्य रूपाची जाणीव त्याला करून दिली. अहंतासूर घाबरला व त्याने सकाळी धूर्मवर्णाच्या स्वप्नाविषयी असुरांना सांगितले. तो म्हणाला, की मी धूम्रवर्णाला प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यांचे डोळे रागाने लालबुंद झालेले होते. आपले संपूर्ण राज्य त्याने जाळून भस्म केले आणि आपण सर्व अशक्त झालो होतो. देवगण स्वतंत्र होऊन धर्ममय जीवन व्यतीत करू लागले असे स्वप्नात पाहिले.

ह्यावर,असुरांनी त्याला स्वप्नावर विश्वास ठेवू नका असे सांगितले. परत त्याला समजाऊ लागले की,”तुम्हाला वर प्राप्त झालेला आहे. तुम्हाला घाबरायचे काहीही कारण नाही. ते स्वप्न काही खरे ठरणार नाही तुम्ही काळजी करू नका असा सल्ला सर्व असुरांनी त्याला दिला. त्यामुळे अहंतासुर पूर्वीसारखाच अत्याचार करू लागला. आपल्या स्वप्नाचा प्रभाव न पडल्याचे पाहून धूम्रवर्णाने महर्षी नारदाला संदेश घेऊन अहंतासुराकडे पाठविले. नारदाकडून अहंतासुराला धूम्रवर्ण गणेशाला शरण येण्याचे सांगितले अन्यथा धूम्रवर्ण तुझा सर्वनाश करणार असा इशाराही दिला.

अशा संदेशाने, अहंतासुर अत्यंत क्रोधित झाला. त्यावेळी तिकडे देवगण सारे धूम्रवर्णाजवळ प्रार्थना करू लागले होते. तेव्हा धूम्रवर्णाने देवतांना सागितले तुम्ही इथेच बसून माझी लीला पाहा. काळजी करू नका. मी अहंतासुराचा वध करतो.

श्री गणेशने आपले आठवे उग्र रूप धारण केले आणि जिथे असुर दिसेल तिथे त्यांना ठार करू लागला. हे दृष्य भयानक पाहून सर्व असूर भयभीत झाले. अहंतासुर ही असुरांचा नाश होतो ते पाहून अत्यंत व्याकूळ झाला. तेव्हा त्याच्या दोन्ही पुत्रांनी गर्व व श्रेष्ठ ह्यांनी त्याला धीर दिला आणि म्हणाले, “आम्ही असताना तुम्हाला काळजी करायची गरज नाही. मायायुक्त धुम्रवर्ण काहीच करू शकणार नाही? एवढे म्हणून गर्व आणि श्रेष्ठ दोघांनी ‍पित्याच्या चरणी प्रणाम केला आणि आपल्या सशस्त्र सैनिकांसह युद्धभूमीवर पोहचले.

पण धूम्रवर्णच्या अमित तेजस्वी ज्वाळात ते सर्वजण जळून गेले. हे सर्व पाहून अहंतासुर अत्यंत व्याकूळ झाला. आता काय करावे त्याला काही सुचेना तेव्हा तो पुन्हा दैत्य गुरू शुक्राचार्याकडे गेला आणि त्यांना धूम्रवर्णापासून रक्षण करण्याची विनंती करू लागला. तेव्हा शुक्राचार्यांनी त्यालासमजावले,” आता नाईलाज आहे. धूम्रवर्ण समोर काही ही उपाय नाही. तेव्हा आता तुला धूम्रवर्णाला शरण जायलाच हवे.” आपल्या दैत्य गुरूदेवनी सांगितल्या प्रमाणे अहंतासुर धूम्रवर्णाला रणांगणात शरण गेला आणि क्षमेची याचना करू लागला. प्रभू धूर्मवर्णानेही त्याला क्षमा करून त्याला आपला भक्त मानले. अहंतासुरने प्रभुला प्रणाम केला आणि शांत जीवन व्यतीत करण्यासाठी पाताळात निघून गेला.

 

*शोभा वागळे*

मुंबई.

8850466717

प्रतिक्रिया व्यक्त करा