You are currently viewing वैभववाडी बस स्थानकाला मिळाला दुसरा वाहतूक नियंत्रक

वैभववाडी बस स्थानकाला मिळाला दुसरा वाहतूक नियंत्रक

*वैभववाडी बस स्थानकाला मिळाला दुसरा वाहतूक नियंत्रक*

*एस.टी. प्रवाशांकडून समाधान व्यक्त*

*ग्राहक पंचायत संस्थेच्या पाठपुराव्याला यश*

वैभववाडी

वैभववाडी बस स्थानकाला बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर दुसरा वाहतूक नियंत्रक मिळाल्याने एसटी प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या माध्यमातून वैभववाडी येथे दुसरा वाहतूक नियंत्रण मिळावा यासाठी अनेक वर्ष प्रयत्न सुरू होते.
वैभववाडी तालुक्याची निर्मिती होऊन ४० वर्षे पूर्ण झाली.
तरी वैभववाडी तालुक्याची संपूर्ण एसटी वाहतूक व्यवस्था कणकवली आगारावर अवलंबून आहे. अनेक वर्षे वैभववाडी येथे एसटी थांबा हा कोणत्याही सोयीसुविधा नसलेल्या एका निवारावजा शेडमध्ये होता. पाच वर्षांपूर्वी महसूल विभागाची इमारत व जागा राज्य परिवहन महामंडळाने ताब्यात घेतल्यानंतर त्याला एसटी थांब्याचे स्वरुप प्राप्त झाले.
यापूर्वी एकच वाहतूक नियंत्रक असल्यामुळे सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळेत प्रवाशांना सेवा मिळत होती. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळच्या एसटी प्रवाशांची गैरसोय होत होती. याबाबत ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेने सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. तसेच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या मासिक सभेमध्ये अशासकीय सदस्य प्रा.श्री.एस.एन.पाटील यांनी मुद्दा उपस्थित करुन मागणी केली होती.
ब-याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर वैभववाडी येथे दि.५ सप्टेंबर, २०२४ पासून दुसरा वाहतूक नियंत्रक मिळाल्याने एसटी प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. परंतु सध्या सोमवार ते शुक्रवार सकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत प्रवाशांना सेवा मिळत आहे. शनिवार आणि रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५
या वेळेतच वाहतूक नियंत्रक असल्याने सकाळी ८ पूर्वीच्या आणि सायंकाळी ५ नंतरच्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. शनिवार आणि रविवार या सुट्टींच्या दिवशी एसटी प्रवाशांची गैरसोय होत आहे. वैभववाडी येथे कायमस्वरूपी म्हणजे सोमवार ते रविवार सकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत वाहतूक नियंत्रक असावेत अशी मागणी होत आहे. बस स्थानकात अद्यापही पिण्याच्या पाण्याची सोय व सौचालय सुविधा नाही. तसेच मुक्कामी गाड्यांच्या वाहक व चालकांच्या राहण्याची गैरसोय आहे. या मुलभूत सुविधा एसटी महामंडळाने उपलब्ध करून द्याव्यात अशी विनंतीवजा मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने करण्यात येत आहे. वैभववाडी बस स्थानकात श्री. बी. सी. गुरखे व ए. सी. दळवी हे वाहतूक नियंत्रक प्रवाशांना चा
सेवा देत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा