You are currently viewing श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – ६४ वे

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – ६४ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वी देशपांडे लिखित श्री गजानन विजय काव्यांजली*

 

।। गण गण गणात बोते ।। जय गजानन ।।

*श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – ६४ वे*

अध्याय – ११ वा , कविता- ४ थी

—————————————

दर्शन त्र्यंबकेश्वराचे घेतले । कुशावर्ती स्नान केले । हराचे दर्शन झाले ।गंगाद्वारी गौतमीचे पूजन केले ।। १ ।।

 

तेथुनी पंचवटीला आले । महंत गोपालदासा भेटले ।

त्यांचे शिष्य स्वामी दर्शनास आले । प्रसाद दिला स्वामींनी ।।

२ ।।

 

काम पंचवटीचे झाले । स्वामी ,नाशिकला आले ।

धुमाळ वकिलाच्या घरी गेलें । मुक्कामासाठी ।। ३ ।।

 

श्री महाराज इथे आले । वृत्त हे साऱ्यांना कळाले ।

लोक खुप आले । स्वामींचे दर्शन घेण्या ।। ४ ।।

 

स्वामी नाशिकाहून शेगाव आले । आडगावचे भक्त झ्यामसिंग भेटण्या आले । तुम्हा नेण्यास आलो,आग्रहाने

म्हणाले । म्हणती त्यास स्वामी- रामनवमी झाल्यावर येऊ आम्ही ।। ५ ।।

 

झ्यामसिंग काही ना बोलला । परत आडगावी गेला ।

पुन्हा शेगावी आला । रामनवमी झाल्यावर ।।६ ।।

 

शेगावचा उत्सव झाला । झ्यामसिंग स्वामींना घेऊन आला।

गावी आपल्या आडगावाला । हनुमान जयंतीसाठी ।। ७ ।।

––———- ————————–

क्रमशः करी हे लेखन कवी अरुणदास ”

—————————————–

कवी- अरुणदास- अरुण वि.देशपांडे-पुणे

—————————————–

प्रतिक्रिया व्यक्त करा