You are currently viewing चला होवू जागतिक वारसा नामांकनाचे साक्षीदार अंतर्गत

चला होवू जागतिक वारसा नामांकनाचे साक्षीदार अंतर्गत

*चला होवू जागतिक वारसा नामांकनाचे साक्षीदार अंतर्गत*

*सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता कार्यक्रम संपन्न*

*सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटना आणि समविचारी संस्थांच्या सहकार्याने स्वच्छता कार्यक्रम यशस्वी*

वैभववाडी

छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश आणि त्यांचे संवर्धन व संगोपन करण्याच्या अनुषंगाने युनेस्कोचे पथक ऑक्टोबर महिन्यात या किल्यांना भेट देणार आहे.
महाराष्ट्रातील अकरा किल्ले आणि तामिळनाडूतील एक अशा एकूण बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश होण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग या दोन किल्ल्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासन, पुरातत्व विभाग, जिल्हा प्रशासन यांनी केलेल्या आवाहनानुसार अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या सूचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेच्या पुढाकाराने जिल्ह्यातील समविचारी संस्थां, शाळा, महाविद्यालये, तरुण मंडळे, शिवप्रेमी, दुर्गप्रेमी व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने रविवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता कार्यक्रम संपन्न झाला.
सदर स्वच्छता कार्यक्रमात किल्यावरील वास्तू, वस्तू यांना धक्का न लावता तटबंदीवर वाढलेले रान, गवत व झुडूपे कोयत्याने व ग्रास कटरचा वापर करून तोडून, ओला, सुका कचरा साफसफाई करून गोळा करण्यात आला.
विजयदुर्ग किल्ल्यावरील स्वच्छता कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटना, ग्राम विकास मंडळ विजयदुर्ग, शिवप्रतिष्ठान मित्र मंडळ नाडण, सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील इतिहास विभाग, आय.इ.एस. माध्यमिक विद्यालय विजयदुर्ग, विध्नहर्ता ग्रुप व सह्याद्रीचे दुर्गसेवक या विविध संस्थां बरोबरच प्रशासनाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे सचिव प्रा. श्री. एस. एन. पाटील, विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे सल्लागार श्री.राजेंद्र परुळेकर, रियाज काझी, मोनिका पुजारे, योगिता परुळेकर, राजाराम सकपाळ, विश्वनाथ गडकर, गौरी मणचेकर, प्रतीक्षा पुजारी, जयवंत डोंगरे, विश्वनाथ सामंत, राजयोगी परुळेकर, सचिन लळीत, लता गिरकर, प्रसाद देवधर, राकेश पाटील, गीता लळीत, मुख्याध्यापक श्री.गुंडू बिर्जे, वैभववाडी महाविद्यालयातील सलोनी पवार, श्वेता सावंत, मृदूला शिवगण, कोमल कदम व
सुनिल राऊळ आदी शेकडो विद्यार्थी व संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
तसेच सिंधुदुर्ग किल्ल्यावरील स्वच्छता कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे सदस्य डॉ.गणेश मर्गज, दिप्ती मोरे, महावारसा समितीचे डॉ.कमलेश चव्हाण, डॉ.संजीव लिंगवत, दुर्ग मावळा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, जनसेवा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, कोल्हापूर येथील निर्भीड पोलीस टाईमचे प्रतिनिधी, शिवप्रेमी प्रतिष्ठानचे रमाकांत नाईक, सह्याद्री प्रतिष्ठानचे यशवंत भालेराव, दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे गणेश नाईक, सर्पमित्र संघटनेचे आनंद बांबार्डेकर, नंदू कुपकर, सिंधुदुर्ग किल्ल्या प्रेरणोत्सव समितीचे गुरुनाथ राणे, भाऊ सामंत, पर्यटन व्यावसायिक महासंघाचे दर्शन वेंगुर्लेकर, सिंधुदुर्ग ऍडव्हेंचर, कट्टा कॉलेजचे रविंद्र गावडे, मिलींद कदम व सिध्दी नेरुरकर सहभागी झाले होते.
या गडकिल्ल्यांवरील स्वच्छता कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व प्रतिनिधींना अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्यावतीने आँनलाईन सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच सर्व संस्था, संघटना, शाळा व महाविद्यालये यांना सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेच्यावतीने सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा