कोल्हापूर येथे होणाऱ्या विभाग स्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रतिनिधित्व करणार
कुडाळ :
ओरोस जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या क्रीडा युवक संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शालेय १४, १७, १९ वर्षे मुलगे / मुलींच्या वयोगटातील जिल्हास्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत कुडाळ हायस्कूलच्या मुलगे व मुलींनी निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले आहे. विजयाची परंपरा कायम ठेवत यावर्षीही सर्व संघावर मात करत १४ वर्ष मुलगे विजयी, १७ वर्ष मुलगे विजयी, १७ वर्ष मुली विजयी, १९ वर्ष मुलगे विजयी व १९ वर्ष मुली उपविजयी असे यश संपादन करून कुडाळ हायस्कुल ज्युनिअर कॉलेजचे वर्चस्व कायम ठेवले आहे.
तसेच कोल्हापूर येथे होणाऱ्या “विभाग स्तरीय स्पर्धेसाठी” त्यांची निवड झाली. यावेळी क.म.शि.प्र. मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, सरकर्यावाह आनंद वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश चव्हाण, सहकार्यवाह महेंद्र गवस, का.आ.सामंत सर, प्रशालेचे मुख्याध्यापक दिनेश आजगावकर सर यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस मॅडम यांनी या यशाबद्दल प्रशालेचे विशेष कौतुक केले.
या खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख, जेष्ठ क्रीडा शिक्षक विजय मयेकर सर, क्रीडा शिक्षक वैभव कोंडसकर सर, रामचंद्र खाकर सर, सिद्धार्थ बावकर सर, अनिल पवार सर, ज्योती ठाकूर मॅडम यांनी मार्गदर्शन केले. प्रशालेचे उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.