*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*भोळा भक्तीभाव*
असा तू ,कसा तू, कुठे तू राहतो
इथे तिथे कुठे कुठे, तुला मी पाहतो
कुठे शोधू तुला मी, का तू दगडात आहे
ध्यानात मनात, वसतो हृदयात आहे
तुझा वास म्हणे, प्रत्येक श्वासात आहे
अस्तित्व तुझे देवा, कणाकणात आहे
माझे तुझे कुणाचे का अट्टहास आहे
सारे सोडून जायचे समर्पणात शांती समाधान आहे
दैव गतीने येते सारे दैव गतीने जाते
पुढ्यात होते सारे मागे निघून जाते
अंतरात्म्याने स्मरतो देवा, भोळा भक्तीभाव आहे
तूच निर्मिता, तूच कर्ताकरविता, हा अटळ विश्वास आहे
पदोपदी भास, आभास तुझा अनुभवावा
तुझ्या दर्शनाचा लाभ, चराचरात मिळावा
कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७७.