You are currently viewing विहिरीत पडलेल्या रानडुक्करांना वनविभागाकडून जिवदान

विहिरीत पडलेल्या रानडुक्करांना वनविभागाकडून जिवदान

विहिरीत पडलेल्या रानडुक्करांना वनविभागाकडून जिवदान

देवगड

देवगड तालुक्यातील विठलादेवी येथे विहिरीत पडलेल्या तीन रानडुक्करांना वनविभागाकडून जिवदान देण्यात आले.हि घटना सोमवारी घडली.याबाबत अधिक वृत असे, विठलादेवी येथील रहिवाशी संतोष काडगे यांच्या घराजवळील विहिरीत तीन रानडुक्करे पडलेली असल्याचे त्यांना सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास समजले.त्यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधला.त्यानंतर उपवनसंरक्षक नवकिशोर रेडी व कणकवली वनश्रेत्रपाल संदीप कुंभार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व याच्या मार्गदर्शनाखाली रात्री ९ वाजता विहिरीत सापळा लावून तीन तासाच्या अथक प्रयत्नाने तिन्ही रानडुक्करांना विहिरीतून सुखरूप बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

या मोहिमेत देवगडचे वनपाल श्रीकृष्ण परीट,फोंडा वनपाल धुळू कोळेकर, ठाकुर वाडी वनरक्षक रामदास घुगे, भिरवंडे वनरक्षक सुखदेव गळवे सहभागी झाले होते.वाहन चालक सागर ठाकुर, प्रसाद तळेकर संतोष काडगे,दिनेश जंगले यांनी यासाठी सहकार्य केले.

संतोष काडगे यांच्या या विहीरीस संरक्षण कठडा नसून वाढलेल्या रानगवतामुळे रात्रीच्यावेळी ५-६ महिन्याची तीन रानडुक्करे विहीरीचा अंदाज न आल्याने ती ३०-३५ फुट खोल असलेल्या विहिरीत पडली असावी.मात्र या विहिरीत पाणी कमी असल्यामुळे ती बचावली.

वन्य अधिनियम १९७२ ने वन्यप्राण्याला संरक्षित केले असून त्यांची हत्या करणे कायद्याने गुन्हा आहे.वन्यप्राणी विहिरीत पडलेला आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन देवगडचे वनपाल श्रीकृष्ण परीट यांनी केले आहे

 

प्रतिक्रिया व्यक्त करा