You are currently viewing मालवण-कुडाळ विधानसभा मतदारसंघात २६ सप्टेंबर रोजी पालकमंत्र्यांकडून जनता दरबार – बाबा मोंडकर 

मालवण-कुडाळ विधानसभा मतदारसंघात २६ सप्टेंबर रोजी पालकमंत्र्यांकडून जनता दरबार – बाबा मोंडकर 

मालवण-कुडाळ विधानसभा मतदारसंघात २६ सप्टेंबर रोजी पालकमंत्र्यांकडून जनता दरबार – बाबा मोंडकर

स्थानिक आमदारांनी मतदारसंघ विकासापासून वंचित ठेवल्याची टीका…

मालवण

पालकमंत्र्यांच्या मागील जनता दरबारात मालवण कुडाळ मतदार संघातून सर्वाधिक ७५० तक्रारी दाखल झाल्याने आमदार वैभव नाईक यांचे कार्य यातूनच जनतेसमोर आले आहे. आमदारांनी कधीही शेतकरी, मच्छीमार, पर्यटक व्यावसायिक, कुडाळ एमआयडीसी येथील अडचणींसदर्भात बैठक घेऊन चर्चा करण्याचे मार्ग काढण्याचे सौजन्यही दाखविले नाही अशी टीका करून भाजपा मालवण शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी पुन्हा एकदा ओरोस येथे जनता दरबार आयोजित केलेला असून मालवण कुडाळ मतदार संघातील जनतेच्या समस्या २६ सप्टेंबर रोजी जाणून घेणार आहेत. या मतदार संघातील जनतेने शासकीय स्तरावरील आपल्या समस्या असतील तर त्या थेटपणे पालकमंत्र्यांकडे मांडाव्यात. असे आवाहन श्री. मोंडकर यांनी केले आहे

मालवण भाजपा कार्यालय येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, पंकज सादये, आबा हडकर, केदार महेश सारंग, बबलू राऊत, केदार झाड, सागर चव्हाण, निश्चय पालेकर, नंदू देसाई, यशवंत मालंडकर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत श्री मोंडकर यांनी
खासदार नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून तसेच माजी खासदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून मालवण कुडाळ मतदार संघात होत असलेली विकासकामे आमदारांनी उघड्या डोळ्यांनी पहावी. मुंबईला जात असताना रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर त्याठिकाणी झालेली कामे त्यांनी व्यवस्थित पहावी. ही कामे गेल्या दहा वर्षात त्यांना करता आली नाही. राज्याच्या सत्तेत गेली साडेसात वर्षे असतानाही आमदारांनी हा मतदार संघ विकासापासून दूर ठेवला. आमदारांनी आपल्या बगलबच्यांना संभाळण्यासाठी रस्त्यांची कामे, शहरातील गल्ल्यांची कामे, स्पोर्टस कॉम्प्लेस अशाप्रकारची कामे दिली होती, मात्र त्यामध्येच भ्रष्टाचार झाल्याने या कामांची दुर्दक्षा आज जनता पहात आहे. यामुळे आमदारांचा पराभव निश्चीत असल्याने त्यांना फक्त सत्ताधाऱ्यांवर टिका करण्याचेच काम शिल्लक राहिले आहे, असे सांगून मोंडकर म्हणाले दहा वर्षे आमदार कार्यकाळात कोणतेही ठोस अपेक्षित विकासकाम वैभव नाईक यांनी केले नाही. फक्त अप्रत्यक्ष ठेकेदारी हेच त्यांचे कार्य राहिले आहे . जनताही त्यांच्या कारभाराला कंटाळली असून जनता आगामी विधानसभा निवडणुकीत चूक सुधारणार आहे. आमदारकीचे शेवटचे दिवस वैभव नाईक मोजत आहेत अशी टीकाही त्यांनी केली

प्रतिक्रिया व्यक्त करा