*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कळी उमलली*
नाजुक लतिका दवात न्हाली कळी उमलली
लेक लाडकी वयात आली कळी उमलली
सृष्टीचे ते अमोघ लेणे प्राप्त जाहले
मुग्ध बालिका षोडश झाली कळी उमलली
वसंत फुलला अंगोपांगी उन्मेषाने
वरदानांना रेखुन भाळी कळी उमलली
शीळ बोलकी घुमू लागता सभोवताली
लज्जेची मग चढता लाली कळी उमलली
नवविश्वाला प्रवेशतांना गोंधळली ती
न्हाणवलीच्या मिळता शाली कळी उमलली
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
9130861304
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
@ सर्व हक्क सुरक्षित
23.09.2023