You are currently viewing विराट आक्रोश मोर्चा

विराट आक्रोश मोर्चा

*विराट आक्रोश मोर्चा*
*जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट आक्रोश मोर्चा*

-महाराष्ट्रातील एकही शाळा बंद केली जाणार नाही असे आश्वासन दयावयाचे आणि दुसरीकडे शाळा बंद योजना, समूह शाळा योजनेची धोरणे आखायची हा उद्योग सुरु आहे. महाराष्ट्रातील गोरगरीब व सामान्य जनतेच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी नियोजन करण्याऐवजी त्यांच्या शैक्षणिक मार्गात अडथळ्या निर्माण केला जात आहे. सरकारी कर्मचाऱ्यांमधील मोठी संख्या असलेल्या शिक्षकांची पदे कमी कशी करता येतील याची काळजी घेऊन धोंरण आखले जात आहे. यातूनच १५ मार्च २०२४ चा संच मान्यता निश्चित करणारा शासन निर्णय पारीत झाला. शाळा बंद करणार नाही, मुख्याध्यापक पदे अतिरिक्त होवू देणार नाही अशी फक्त पोषणा केली जाते.
*प्रत्यक्षात मात्र महाराष्ट्रातील हजारो शाळांचे भवितव्य अंधारात ढकलणारा कंत्राटी भरतीचा शासन निर्णय ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी जाहीर करून राज्यातील शिक्षकांची चेष्टा करण्यात आली आहे*.

दि. १४ सप्टेंबर २०२४ शिक्षक भवन, पुणे येथे सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांची निर्धार बैठक संपत्र झाली. महाराष्ट्राचे शिक्षण क्षेत्र वाचवण्यासाठी एकवटलेल्या सर्व संघटनांनी साखळी आंदोलनाचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला .

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा, शिक्षण, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या संबंधाने शासनाकडून दुर्लक्ष होत आहे. *सोबतच शिक्षण हक्क कायदा २००९ मधील तरतुदीस विसंगत अशा दि. १५ मार्च २०२४, ५ सप्टेंबर २०२४ च्या शासन निर्णयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांचे अस्तित्वच संपणार आहे*. *स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांचेचे शिक्षण संपविण्याचे धोरण व उपक्रम अलीकडे घेतलेल्या शासन निर्णयामुळे अधोरेखित झाले आहे*.
यासह अन्य मागण्यांच्या सोडवणुकी संबंधाने शासन स्तरावरन कोणतीही अनुकूल भूमिका घेतली जात नाही. प्राथमिक शिक्षकांच्या , विदयाथ्र्यांच्या समस्या समजून घेणे व त्यावर अनुकूल असा निर्णय घेण्याच्या बाबतीत प्रचंड उदासीनता आहे. त्यामुळे अत्यंत व्यथित होऊन राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांतील शिक्षक आणि तेथे शिकणाऱ्या पालकांच्या संतप्त प्रतिक्रिया लक्षात घेता राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांना तीव आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
*पालक , शाळा व्यवस्थापन समित्या , लोकप्रतिनिधी , सेवाभावी संस्था तसेच शिक्षण प्रेमी , तज्ञ यांचा या शिक्षण बचाव आंदोलना पाठिंबा असून सिंधुदुर्ग जिल्हयातील या सर्व घटकांनी या आंदोलनात सक्रिय सहभागी व्हावे असे विनम्र आवाहन सर्व संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे*.
सिंधुदुर्ग जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व प्राथमिक शिक्षक , पदवीधर शिक्षक , मुख्याध्यापक , केंद्र प्रमुख यांना २५ सप्टेंबर २०२४ रोजी सामुहीक किरकोळ रजा घेऊन विराट मोर्चामध्ये सामील होण्याचे आवाहन सर्व संघटनांचे वतीने करीत आहोत .

*मोर्चाद्वारे मांडल्या जाणाऱ्या मागण्या*

(1) 15 मार्च 2024 चा संचमान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा.

*(2) 20 किंवा 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांच्या बाबतीत कार्यरत शिक्षकाचे एक पद बंद करण्याचा आणि कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त व अन्य नियुक्ती देण्याचा 5 सप्टेंबर 2024 चा शासन निर्णय रद्द करावा*.

(3) विद्यार्थी आधार कार्ड संबंधाने असणाऱ्या वास्तव अडचणी लक्षात घेऊन आधार कार्ड आधारित शिक्षक पद निर्धारण धोरण रद्द करावे.

(4) सातव्या वेतन आयोगातील पदवीधर शिक्षकांच्या व वरिष्ठ वेतनश्रेणी धारक शिक्षकांच्या वेतन त्रुटीचा विषय मार्गी लावावा.

*(5) 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात निघालेल्या जि.प. शिक्षकांना 1982 चे पेन्शन आदेश निर्गमित करावेत*.

(6) विद्यार्थ्यांना मोफत गणवेश अविलंब मिळावेत, 2024-25 वर्षात राबविली गणवेश योजना रद्द करून जुन्याच पद्धतीने गणवेश योजना कार्यान्वित करावी. अद्यापही अनेक ठिकाणी पाठ्यपुस्तके मिळालेली नाहीत, त्याठिकाणी तातडीने पाठ्यपुस्तके व पुरवावीत, पाठ्यपुस्तकांना कोरी पाने न देता स्वतंत्र स्वाध्याय पुस्तिका द्याव्यात.

(7) शैक्षणिक-अशैक्षणिक कामाच्या शासन निर्णयात शिक्षक संघटनांसह चर्चा करून दुरुस्ती करावी.

(8) जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मुख्यालयी निवासाची सक्ती रद्द करणे.

(9) राज्यातील शिक्षकांना 10-20-30 सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करावी. सर्व पदवीधर शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी मिळावी.

(10) अनुकंपा तत्त्वावर नियुक्त शिक्षकांना TET अनिवार्यतेचा शासन निर्णय रद्द करावा.

(11) नपा/ मनपा गट क, ड मधील शिक्षकांच्या वेतनाचे 100% अनुदान शासनाने द्यावे या शिक्षकांचे वेतन शालार्थ प्रणालीत E-Kuber अंतर्गत व्हावे.
(12) शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवावी.

(13) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळात वाढती अनेकविध अभियाने उपक्रम, निरनिराळे सप्ताह, बहिःशाल संस्थांच्या परीक्षा Online माहित्या, BLO काम अशी सुमारे १५० अशैक्षणिक कामे माहित्यांची वारंवारिता इत्यादी कामे ताबडतोब थांबवावी.
१४ )केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी पदे पदोन्नतीने तात्काळ भरावीत.
१५ )केंद्रप्रमुख पद तांत्रिक सेवेत समाविष्ठ करावे .

१६ )पवित्र पोर्टलद्वारे भरतीमध्ये ज्या माध्यमाची शाळा त्याच माध्यमाचा शिक्षक देण्यात यावेत
*यावेळी खालील संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.*
श्री राजन कोरगांवकर,राज्य सरचिटणीस.प्राथ शिक्षक समिती,श्री म ल देसाई,राज्य संयुक्त सरचिटणीस,अखिल महा प्राथ शिक्षक संघ,नामदेव जांभवडेकर,राज्य पदाधिकारी,प्राथ शिक्षक समिती,राजा कवीटकर,जिल्हाध्यक्ष,अखिल महाराष्ट्र प्राथ शिक्षक संघ,नंदकिशोर गोसावी,सचिव,महा राज्य पदवीधर प्राथ शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना,राजू वजराटकर,जिल्हाध्यक्ष महा राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन,विकास वाडीकर,जिल्हाध्यक्ष,कास्ट्राइब प्राथ शिक्षक संघटना,सुरेखा परब,जिल्हाध्यक्ष ,दिव्यांग कर्मचारी संघटना,शिवाजी पवार,जिल्हाध्यक्ष,महा राज्य केंद्रप्रमुख संघ,शिवाजी गावित,जिल्हा सचिव महा राज्य केंद्रप्रमुख संघ,केंद्रप्रमुख समन्वय समिती दिनकर तळवणेकर,महादेव आव्हाड,संजय पवार,लहू दहिफळे,गोविंद चव्हाण,सदगुरु कुबल,कमलाकर ठाकूर.

प्रतिक्रिया व्यक्त करा