श्रृतीका मोर्ये हीने पं पु नामदेव महाराज यांच्या पुण्यभुमीतुन आंदुर्ले गावची कन्या म्हणून अभिमानास्पद नाव कमवले
– आमदार वैभव नाईक!
कुडाळ
आंदुर्ले गावची कन्या आणि पखवाज विशारद आनंद मोर्ये यांची कन्या कु श्रृतिका मोर्ये हीने युवा कला स्पर्धेत पखवाज वादनात यश संपादन केले ही खरोखरच गौरवास्पद बाब आहे असे गौरवोद्गार कुडाळ मालवण मतदार संघाचे लोक प्रिय आमदार वैभव नाईक यांनी काढले!
श्रृतीका मोर्ये हीचा शाल श्रीफळ देऊन आम नाईक यांनी आंदुर्ले येथे तिच्या निवासस्थानी जाऊन सन्मान केला यावेळी आम नाईक बोलत होते,
आम नाईक बोलताना पुढे म्हणाले आंदुर्ले ही कलाकारांची खाण असुन पं पु नामदेव महाराज यांच्या पुण्यभुमीत असे अनेक बाल कलाकार आपला ठसा उमटुन आंदुर्ले सारख्या पवित्र भुमीचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेऊन पोचवतात असे सांगून आम नाईक म्हणाले कु श्रृतिका हीने महाविद्यालयीन उच्चस्तरीय युवा कला स्पर्धेत पखवाज वादन यामध्ये यश संपादन केले ही गौरवाची बाब असुन तिचे वडील पखवाज विशारद आनंद मोर्ये यांच्या पाऊलावर पाऊल वाटचाल करुन पखवाज ही कला फक्त पुरुषांची नसुन महीला सुध्दा ठसा उमटु शकतात हे दाखवुन दीले आहे असेही श्री नाईक यांनी सांगितले,
यावेळी माजी सरपंच संतोष पाटील,माजी सरपंच सौ पुजाताई सर्वेकर, युवा कार्यकर्ते गोकुळदास पिंगुळकर, श्री समिर पेडणेकर, श्री विजय राणे, श्री सतिश परब, अॅड आनंद परब, आनंद मोर्ये व इतर उपस्थित होते