You are currently viewing शिक्षक भारतीचे ५ व ६ रोजी आभासी निषेध संमेलन

शिक्षक भारतीचे ५ व ६ रोजी आभासी निषेध संमेलन

राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या विरोधात शिक्षक भारतीचे ५ व ६ रोजी आभासी निषेध संमेलन

कासार्डे / दत्तात्रय मारकड :-

केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 जाहीर केले आहे. शिक्षणाच्या आणि शिक्षकांच्या मुळावरच उठणारे हे धोरण आहे. या शैक्षणिक धोरणाच्या विरोधात दिनांक 5 व 6 सप्टेंबर रोजी होणाऱ्या देशव्यापी ऑनलाईन निषेध संमेलनात विद्यार्थी, पालक, शिक्षणतज्ज्ञ, संस्थाचालक व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी सामील होणार आहेत. निषेध संमेलनाची रूपरेषा पुढीलप्रमाणे आहे

दिवस पहिला
5 सप्टेंबर 2020
सायंकाळी 4 वाजता युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचे माजी अध्यक्ष
सुखदेव थोरात यांच्या हस्ते उदघाटक होईल
उद्घाटन सत्राच्या अध्यक्षा :
श्रीमती ताप्ती मुखोपाध्याय, (अध्यक्षा- एमफुक्टो) भुषविणार आहेत. महासभेचे
स्वागत व प्रास्ताविक शिक्षक भारती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष
अशोक बेलसरे करणार आहेत.
माजी अध्यक्ष, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन सुखदेव थोरात यांचे मुख्य भाषण होणार आहे

दुस-या सत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर देशातील विविध शिक्षक संघटना प्रतिनिधींचे संमेलन होणार आहे.या सत्राचे
सूत्रसंचालन शिक्षक भारती सुभाष मोरे कार्याध्यक्ष करणार आहेत.
याप्रसंगी
प्रमुख वक्ते म्हणून जालिंदर सरोदे, प्रमुख कार्यवाह, शिक्षक भारती, कौशल कुमार, प्रदेश मंत्री, उत्तर प्रदेश प्राथमिक मित्र संघ, राजेंद्र शर्मा,
संयोजक, हरियाणा अतिथी अध्यापक संघ,
सुनील चौहान,
राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय अस्थायी अध्यापक महासंघ, हिमाचल प्रदेश दिनेश कर्नाटक,
उत्तराखंड, संपादक शैक्षिक दखल पत्रिका, अजमेर सिंग,
पंजाब शिक्षा प्रोव्हायडर, पुनीत चौधरी, महामंत्री, उत्तर प्रदेश प्राथमिक शिक्षा मित्रसंघ, नवनाथ गेंड,
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती, रविंद्र मेढे अध्यक्ष- छात्र भारती उपस्थित राहणार आहेत.
श्रीमती ताप्ती मुखोपाध्याय, अध्यक्षा, एमफुक्टो यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे.
दिवस दुसरा म्हणजे
दि.6 सप्टेंबर 2020
सायंकाळी 4 वाजता
शैक्षणिक धोरणावर आधारीत विविध राज्यांचे प्रतिनिधी ठराव मांडण्यात येणार आहेत.

समारोप कार्यक्रमाला
शिक्षक आमदार, मुंबई शिक्षक मतदारसंघचे
कपिल पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
अशी माहिती
राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्र सेवा दलाच्या .डाॅ. गणेश देवी यांनी दिली.
हे संमेलनात खालील साधनांचा वापर करून सहभाग नोंदविता येईल

Rashtra Seva Dal India युट्युब चॅनलला
https://www.youtube.com/channel/UCbOp00AwDCYDvJc2m4WkM0w

आणि

Shikshak Bharati फेसबुक पेजला
https://www.facebook.com/shikshak.bharati/

Live बघता येईल

संमेलनात सहभागी होण्यासाठी Rashtra Seva Dal India युट्युब चॅनलला Subscribe करा, Bell Icon दाबा. आणि Shikshak Bharati फेसबुक पेजला Like करा.
असे आवाहन संयोजक राष्ट्र सेवा दल शिक्षक भारती
छात्र भारतीच्यावतीने राज्य प्रमुख कार्यवाह तथा जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा