*ज्येष्ठ लेखिका कवयित्री स्वप्नगंधा आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अजुनि कां?*
अजुनि रात्र जागीच आहे
अंधाराची शाल पांघरुनी
काजव्यांचे थवे चमकती
प्रकाशाचा भास लेवुनि
अंगाई गाती निजवाया
लुकलुकत्या तारका गगनी
परी निज कां येत नाही
सार्या धरतीचे उसासेमनी
तू दुखावुन कां होणार आहे
येई कोणकां तव सांत्वनी
जो तो आपुल्याच चिंतेत
तू एकटीच दुःखाची धनी
अजुनि तू कां जागीच आहे
प्राची येई गुलाल उधळुनि
अजुनि रात निजलीच नाही
प्रकाश येई किरणे पसरुनि
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर