You are currently viewing के.एल.पोंदा.हायस्कूल, डहाणू येथे हिंदी दिवस व हिंदी सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा !

के.एल.पोंदा.हायस्कूल, डहाणू येथे हिंदी दिवस व हिंदी सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा !

डहाणू :

 

दिनांक १४ सप्टेंबर हिंदी दिवस निमित्ताने, हिंदीमय वातावरण निर्माण झाले.दि डहाणू एज्यूकेशन ट्रस्ट चे सचिव सुधीर कामत सर,व संस्थेचे पदाधिकारी तसेच प्राचार्य सोपान इंगळे सर यांनी हिंदी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.यासाठी सुनील मोरे सर पर्यवेक्षक यांनी देखील शुभेच्छा दिल्या व हिंदी भाषेच महत्त्व सांगितले.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेतून सुंदर गीत सादर केले. या कार्यक्रमाचे आयोजन, सूत्रसंचलन, शाळेच्या हिंदी विभाग प्रमुख, उपक्रमशील शिक्षिका अनुपमा जाधव (हिंदी भाषेच्या प्रसारक प्रचारक)यांनी केले. हिंदी विषय शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना त्यांच्या तर्फे गुलाब पुष्प व पेन देऊन सन्मान करण्यात आला. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे तिचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे.तसेच राष्ट्रभाषा हिंदी परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा.हिंदी दिवस फक्त एक दिवस साजरा करुन चालणार नाही.तर हिंदी भाषा आपण रोज व्यवहारात देखील बोलत असतो.हिंदी विषय शिकतो. याचा आनंद विद्यार्थ्यांना वाटतो. हिंदी भाषा शिकायला,बोलायला विद्यार्थ्यांना देखील आवडते.

यात ७वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हिंदी काव्य गायन , निबंध लेखन,काव्य लेखन,काव्य सादरीकरण,भाषण, असे विविध उपक्रम राबविण्यात आले. निबंध लेखन या उपक्रमात १०१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. हरेश्र्वर दिवे सर, चंद्रकांत खुताडे सर, तुषार मडवे सर, शीला सुरती मॅडम ,किर्ती मॅडम, अनंत पवार सर,गीता पाटील मॅडम यांचे हिंदी दिनाच्या निमित्ताने गुलाब पुष्प व पेन देऊन स्वागत करण्यात आले.

राष्ट्रभाषा हमारी हिंदी

जैसे माथे पे लगाई बिंदी!

राष्ट्रभाषा हमारी शान

सुंदरता कि पहचान..!

 

हिंदी पढो़,आगे बढो़

भारत जोडो..!

 

प्रतिक्रिया व्यक्त करा