You are currently viewing निबंध व काव्यलेखन स्पर्धेत के.एल.पोंदा हायस्कूल डहाणूच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

निबंध व काव्यलेखन स्पर्धेत के.एल.पोंदा हायस्कूल डहाणूच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

डहाणू :

 

कोकण मराठी साहित्य परिषद डहाणू शाखेतर्फे घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय स्पर्धेत निबंध व काव्यलेखन स्पर्धेत के.एल. पोंदा. हायस्कूल डहाणू येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. सदर काव्यलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक कु.भार्गवी विजय राऊत (इ.१० ब), तर निबंध लेखन स्पर्धेत द्वितीय क्रमांक.कु.काजल दिलीप चौधरी (इ.९ ई), उत्तेजनार्थ कु.अंकिता जितेंद्र हरिजन (इ.१०अ) को.म.सा.प.डहाणू शाखेतर्फे यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आली.

या कार्यक्रमात दि डहाणू एज्यूकेशन ट्रस्टचे अध्यक्ष तरुणभाई पोंदा सर, सचिव सुधीर कामत सर, प्राचार्य सोपान इंगळे सर, को.म.सा.प. चे पालघर जिल्हाध्यक्ष प्रविण दवणे सर, डॉ.अंजली मॅडम व पदाधिकारी, सदस्य, शिक्षक वर्ग आणि विदयार्थी उपस्थित होते.

या विद्यार्थ्यांना शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका, कवयित्री, लेखिका अनुपमा जाधव यांनी मार्गदर्शन केले. शालेय विद्यार्थ्यांसाठी त्या नेहमीच कविता फुलते कशी! कथाकथन, निबंध लेखन, वक्तृत्व अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करीत असतात. या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षक व पालक वर्ग, विद्यार्थ्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा