*जिल्हाधिकाऱ्यांच्या मुंबई दौऱ्यामुळे त्यांच्यासमवेत आमदार वैभव नाईक यांची उद्या सोमवारी होणारी बैठक रद्द*
सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना सोमवारी मिटिंगसाठी मुंबईला जावे लागणार असल्याने नागरिकांच्या प्रश्नांसाठी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत आमदार वैभव नाईक यांची उद्या सोमवार दिनांक 23/09/2024 रोजी दुपारी 3 वाजता आयोजित केलेली बैठक रद्द करण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत ही बैठक पुन्हा आयोजित करून लवकरच बैठकीची वेळ कळविण्यात येईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी.