You are currently viewing स्टेपिंग स्टोनच्या सोहम देशमुखचे राष्ट्रीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत यश

स्टेपिंग स्टोनच्या सोहम देशमुखचे राष्ट्रीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत यश

सावंतवाडी:

दिनांक १९ व २० सप्टेंबर २०२४ रोजी पणजी, गोवा येथे झालेल्या Blitz Open Rating Chess Tournament मध्ये सोहम देशमुखने १३ वर्षा खालील वयोगटांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. ही स्पर्धा एकूण ११ राऊंडची झाली. त्यामध्ये सोहमने ७ राऊंडमध्ये विजय मिळविला. ही स्पर्धा कै.श्रीमती सुनंदाबाई दयानंद बांदोडकर मेमोरियल यांच्यावतीने व तीसवाडी तालुका चेस असोसिएशन यांच्यामार्फत या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला संपूर्ण भारतामधून २१४ स्पर्धक विविध राज्यांमधून आलेले होते. याकरिता त्याला पालकांचे, प्रशालेचे क्रीडा शिक्षक समद शेख व हमीद शेख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी कु. सोहम देशमुख याचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा