You are currently viewing उज्जैनकर फाउंडेशनचा १५ वा वर्धापन दिन सोहळा थाटात संपन्न होणार..! 

उज्जैनकर फाउंडेशनचा १५ वा वर्धापन दिन सोहळा थाटात संपन्न होणार..! 

मुक्ताईनगर:

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जि. जळगावचा १५ वा वर्धापन दिन सोहळा गोदावरी मंगल कार्यालय, मुक्ताईनगर येथे २९ सप्टेंबर रोजी मोठ्या थाटात संपन्न होणार आहे याप्रसंगी राज्यातील विविध जिल्ह्यातील ५० मान्यवरांना तापी- पूर्णा राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच आदर्श शिक्षक व आदर्श पत्रकारिता तसेच आदर्श समाजसेवा पुरस्काराने गौरव करण्यात येणार त्याचप्रमाणे मुक्ताईनगर तालुक्यातील विविध शाळा, महाविद्यालयातील इयत्ता दहावी व बारावीच्या ८५ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा सुद्धा संपन्न होणार आहे याप्रसंगी सकाळी ठीक ९.३०वाजता तालुकास्तरीय गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार श्री दिलीप तात्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच भारताची पहिली महिला सर्पमित्र व राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या वनिताताई बोराडे , हीवरा आश्रम यांच्या शुभहस्ते या सोहळ्याचे उद्घाटन होणार असून या सोहळ्यास विशेष उपस्थिती म्हणून मॅगसेस पुरस्कार विजेत्या तथा पद्मश्री नीलिमाताई मिश्रा त्याचप्रमाणे मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या सन्माननीय चेअरमन तथा जे. डी. सी. सी. बँक, जळगावच्या माजी चेअरमन अँड रोहिणीताई खडसे, खेवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा तालुकास्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.

त्याच प्रमाणे भोजनानंतर दुपारी ठीक १ ते ४ या वेळात तापी- पूर्णा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे हा सोहळा फाउंडेशनचे राज्य अध्यक्ष अमरावती येथील ज्येष्ठ साहित्यिक ,विचारवंत डॉ. सतीश तराळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेला असून फाउंडेशनचे राज्य उपाध्यक्ष खामगाव येथील श्री विनोदभाऊ डिडवानिया यांच्या शुभहस्ते या सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे त्याचप्रमाणे या सोहळ्यास विशेष उपस्थिती म्हणून केंद्रीय युवा राज्यमंत्री खासदार श्रीमती रक्षाताई खडसे तथा मुक्ताईनगर मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री चंद्रकांतभाऊ पाटील यांची विशेष उपस्थिती असणार आहे याप्रसंगी मुक्ताईनगर तालुक्यातील विविध पदाधिकारी तसेच फाउंडेशनचे राज्यातील विविध पदाधिकारी याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील असे या सोहळ्याचे मुख्य आयोजक तथा शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा