You are currently viewing डोळ्यात तुझ्या अंगार पाहिजे

डोळ्यात तुझ्या अंगार पाहिजे

*डॉ.शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे(मुक्ताईनगर) सन्मा.सदस्य शाहीर मनोहर पवार केळवदकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*डोळ्यात तुझ्या अंगार पाहिजे*

 

नको भीक आम्हा ।

तो स्वाभिमान पाहिजे ।

फाडतील लांडगे ।

ते तुला ग।

डोळ्यात तुझ्या ग अंगार पाहीजे ॥ १

 

घरात बंधने जायबंदी | चौकात छपरी पोरे

टुकार मस्तीमंदी ।

 

अन्यायी हात । तोडले पाहिजे । डोळ्यात तुझ्या ग । अंगार पाहिजे॥२

 

करीत आले । आजवर शोषण । लाविले अनेक दूषण

रणरागिणी मर्दानी।

तु झाली पाहिजे । डोळ्यात तुझ्या ग अंगार पाहिजे॥ ३

 

अपमान अत्याचार होई गल्लो गल्ली । कोलकाता,मणिपूर सुटली ना दिल्ली । घरा घरात आता ।

एक फुलन पाहिजे ।

शिवा पाहिजे । डोळ्यात तुझ्या ग अंगार पाहिजे ॥ ४

 

वाढली रोज । नराधमाची वस्ती ।

अब्रू झाली पहा ही सस्ती ।

 

गुंडांना या षढांना। फक्त छत्रपती

शासन पाहिजे ।

ताई तुझ्या डोळ्यात । आता अंगार पाहिजे॥ ५

 

घरोघरी द्या

संस्कार शिवबाचे ।

घ्या शिक्षण तुम्ही आत्मरक्षणाचे । अंधार झाला फार एक शिवसुर्य पाहिजे । हक्कासाठी तु लढली पाहिजे।

कर बदल कर तुझ्यात ।

मर्दानी झाली पाहिजे । डोळ्यात तुझ्या आता अंगावर पाहिजे॥ ६

 

सांगे शाहीर पवार

सावित्री,जिजाई, झाली पाहिजे । डोळ्यात तुझ्या

आता अंगार पाहिजे ॥

 

शाहीर

मनोहर पवार. केळवद ता चिखली .

मो . 9850812 6 5 1.

प्रतिक्रिया व्यक्त करा