*राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सोहळा प्रसारण सोहळा रविवारी सह्याद्री वाहिनीवर*
*बांदा*
महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा सर्वोच्च क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार ५सप्टेंबर २०२४रोजी नरीमन पाँइंट मुंबई येथे संपन्न झाला होता.या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दिपकभाई केसरकर , विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर,शालेय शिक्षण आयुक्त, शिक्षण सचिव, राज्य प्रकल्प संचालक आदि मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक विभागातील माध्यमिक विभाग आदिवासी क्षेत्र,आदर्श महाला शिक्षिका,कला, क्रीडा ,दिव्यांग व स्काऊट गाईड या विभागातील शिक्षकांना सन्मानित करण्यात आले आहे.या सर्व कार्यक्रमाचे प्रसारण मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर रविवार दि.२३सप्टेंबर २०२४रोजी सायंकाळी ६.००वाजता करण्यात येणार आहे.सदर पुरस्कारात बांदा येथील पीएम श्री जिल्हा परिषद केंद्र शाळेचे उपक्रमशील शिक्षक जे.डी पाटील यांचा समावेश होता.त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.