*सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. प्रवीण नारायण महाजन यांच्या ‘प्रेमोळी ‘ काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न*
पिंपरी
स्वर्गीय जानकीबाई नारायणराव महाजन जन्मशताब्दीनिमित्त आयकोनोक्लासिक फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड आयोजित आणि केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचे सेवानिवृत्त क्षेत्रीय संचालक डॉ. प्रवीण नारायण महाजन यांच्या ‘प्रेमोळी’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन प्लॅटिनम हॉल, हॉटेल बर्ड व्हॅली, संभाजीनगर, चिंचवड येथे शुक्रवार, दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी संपन्न झाले. यावेळी “प्रेम हा मानवी जीवनाचा पाया असतो!” असे विचार कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी – महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांनी व्यक्त केले. गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र प्रमुख, अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. विशेष अतिथी ज्येष्ठ कवयित्री मीना सुरेश पाटणे, वर्षा महाजन, कवी डॉ. प्रवीण महाजन यांची व्यासपीठावर तसेच १९८३ पासूनच्या विदर्भातील विविध अभियांत्रिकी समूहातील अभियंत्यांची सभागृहात विशेष उपस्थिती होती.
राजन लाखे पुढे म्हणाले की, “साध्या – सोप्या शब्दांत प्रेमाचे विविध आविष्कार ‘प्रेमोळी’ या कवितासंग्रहात आविष्कृत झालेले आहेत. मनात प्रेमभावना जागृत झाली की, तिचे रूपांतर काव्यात होते. अश्लीलतेचा लवलेश नसलेला शुद्ध शृंगार प्रवीण महाजन यांच्या कवितांमधून प्रकट झाला आहे. काव्य हा साहित्यातील सर्वोच्च प्रकार आहे; तर शृंगार हा साहित्यातील नवरसांमध्ये परम स्थानावर आहे. समाजाच्या सुख – दुःखाशी समरस झाल्याशिवाय आशयगर्भ कविता निर्माण होत नाहीत!” मीना पाटणे यांनी कौटुंबिक स्नेहबंधाच्या आठवणींना उजाळा देताना ‘प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असूनही महाजन परिवाराने मुलांना उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत केले’, अशी माहिती दिली. डॉ. प्रवीण महाजन यांनी आपल्या मनोगतातून, “सिनेसृष्टीत चित्रपट निर्मितीसोबत आयकोनोक्लासिक फिल्म्स ही संस्था ‘प्रेमोळी’च्या निमित्ताने प्रकाशन क्षेत्रात पदार्पण करीत आहे. वडील साहित्याचे व्यासंगी अभ्यासक होते. त्यांचा साहित्य वारसा जोपासताना अनेक वर्षांपासूनचे काव्यसंचित ‘प्रेमोळी’त संकलित केले आहे. लता मंगेशकर यांची या शृंगारिक रचनांना विशेष दाद मिळाली होती, हा आनंद अविस्मरणीय आहे!” अशा भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमादरम्यान चिंचवडचे अतिवरिष्ठ नागरिक विष्णुपंत धमाले जे डॉ. प्रवीण महाजन यांचे अचलपूरला शिक्षक होते, त्यांचा त्यांच्या पत्नीसह विशेष सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली; तसेच स्मिता वैद्य, केशव चेरकू, प्रा. नरहरी वाघ या साहित्यिकांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. प्रशांत बुरडे यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “अभियांत्रिकी क्षेत्रातील शासकीय नोकरीतल्या साचेबंद कारकिर्दीत डॉ. प्रवीण महाजन यांनी मनाची संवेदनशीलता सजग ठेवून साहित्य, कला, संस्कृतीची आवड जोपासली, ही कौतुकास्पद बाब आहे. या प्रसंगी विशेष नमूद करावसे वाटते की, ज्ञानपिपासू डॉ. महाजन हे मूलत: अभियंता असूनही त्यांच्याजवळ मराठी साहित्यातील पीएच. डी.सह आठ विविध विषयांतील अधिकृत विद्यापीठाच्या अकरा पदव्या आहेत. अलीकडेच त्यांना वास्तुशास्त्रात विद्यापीठातून प्रथम क्रमांक मिळाला आहे. व्यवस्थापक, अभियंता, ज्योतिषी, वास्तुशास्त्रतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, लेखक, कवी, नाट्य लेखक, नाट्य दिग्दर्शक, अभिनेता, संपादक, गायक, छायाचित्रकार, चित्रपट संशोधक, चित्रपट निर्माता असे अष्टपैलू या विशेषणालाही लाजवणाऱ्या डॉ. महाजन प्रवीण यांच्या
पटकथेला साहित्याचा प्रकार सिद्ध करणाऱ्या ‘मराठी साहित्य आणि चित्र ‘पटकथा’- शतकी वाटचाल १९१३ – २०२३’ या ग्रंथासही साहित्याची अनेक पारितोषके झाली आहेत!” असे गौरवोद्गार काढले.
प्रा. नरहरी वाघ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. वर्षा महाजन यांनी आभार मानले. वर्षा बुरडे यांनी सादर केलेल्या कथ्थक नृत्यातील कवित्ताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
______________________________
*संवाद मीडिया*
🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡
*प्रॉपर्टी विकणे आहे*
*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*
https://sanwadmedia.com/148054/
*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*
*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*
*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*
*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*
*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈
*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*
*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*🔍
*जाहिरात लिंक*
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*