You are currently viewing रम्य जीवनाचे सार

रम्य जीवनाचे सार

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*रम्य जीवनाचे सार*

 

इथे नित्य सुखी श्रद्धावंत जीव

मनी सज्जनांचे सदा देवभाव |

मना सत्यासंगे रहावे सदैव

श्रद्धा शिव ब्रम्ह हो आशीष भाव ||१||

 

जन्म जीवनाचे खरे ज्ञान व्हावे

पुनर्जन्म कुणा का ठाऊक आहे |

विश्व सृष्टीमाजी अलौकिक यावे

अलौकिक येथे चिरंजीव आहे ||२||

 

जीव शिव ब्रम्ह अंतरात पाहे

देव दैव सारे अंतरात आहे |

सुखी जीवनाचे जगी सार नोहे

रम्य जीवनाचे मनी सार आहे ||३||

 

कवी :- श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.

फणसखोल, आसोली, ता.- वेंगुर्ला,

जि.- सिंधुदुर्ग, राज्य – महाराष्ट्र.

प्रतिक्रिया व्यक्त करा