You are currently viewing पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिनी रक्तदान शिबिराचे प्रभाकर सावंत यांच्या हस्ते उद्घाटन!

पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिनी रक्तदान शिबिराचे प्रभाकर सावंत यांच्या हस्ते उद्घाटन!

पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिनी रक्तदान शिबिराचे प्रभाकर सावंत यांच्या हस्ते उद्घाटन!!!

दोडामार्ग

दोडामार्ग तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले या उत्स्फूर्त ५३ जणांनी केले रक्तदान केले यावेळी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते

चेतन चव्हाण मिञमंडळ दोडामार्ग व भारतीय जनता पार्टी दोडामार्ग आयोजित पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे उदघाट्न भाजपा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले. पिपंळेश्वर हॉल दोडामार्ग येथे आयोजित रक्तदान शिबिरात ५३ जणांनी रक्तदान केले.

रक्तदान शिबिरास जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, मंदार कल्याणकर, श्री.दळवी, सुधिर दळवी, रंगनाथ गवस, यावेळी समिर रेडकर, सुमित म्हाडगुत, मनोज पार्सेकर, लक्ष्मण कवठणकर, सुनिल गवस, देवेंद्र शेटकर, पराशर सावंत, दीपक गवस, स्वप्निल गवस यांनी विशेष मेहनत घेतली.

सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी रक्तदान करुन समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन करण्या अगोदर शहरातील मुख्य चौकात शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा