*सासोली जमीन गैरव्यवहार प्रकरणी संदेश पारकर यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस एसपी चा पाठिंबा —
— अमित सामंत
दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यातील सासोली जमीन गैरव्यवहार प्रकरण गेले अनेक दिवस गाजत असूनही महसूल विभाग नरोवा कुंजरोवा भूमिकेत असून राजकीय वरदहस्ताने महसूल विभाग दबला गेलेला आहे,असा सूर संपूर्ण जिल्ह्यात चर्चिला जात आहे, जिल्ह्याचे विद्यमान कर्तव्यदक्ष पालकमंत्री यांनी याप्रकरणाची एवढी दखल घेतली होती की तत्कालीन जिल्हाधिकारी तावडे यांना मिडिया समोर ज्या पद्धतीने समज दिली त्यावेळी जिल्ह्यातील जनता खरोखरच सुखावली होती, आणि पालकमंत्र्यांकडून जिल्हा वासियांच्या महसूल विभागातील भ्रष्ट कारभारामुळे मेटाकुटीला आलेल्या जनतेला एक आशेचा किरण निर्माण झाला होता,पण तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना जे सुनावलं होत ती एक राजकीय स्टंटबाजी होती,हे आता जिल्हावासीयांना समजले असून सासोली जमीन गैरव्यवहार प्रकरणात आक्रमक पालकमंत्र्यांचे नमते का ॽ सदर जमीनीचा झालेला खरेदीचा व्यवहार तात्काळ रद्द करून याप्रकरणात तत्कालीन दोडामार्ग तहसिलदार व संबंधितांवर कारवाई करण्याचे संकेत जाहीररीत्या दिले होते याचा खुलासा पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील जनतेला देणे गरजेचे आहे,वास्तविक जिल्ह्यातील सर्व सामान्य माणसाला जमीन विकत घ्यायची असेल तर महसूलचा शेतकरी असल्याचा दाखला प्राप्त केल्या शिवाय जमीन खरेदी व्यवहार करता येत नाही,असा नियम महसूल विभागाचा असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात परप्रांतीय लोक जमीनी कोणत्या नियमात आणि कुणाच्या आशीर्वादाने खरेदी व्यवहार करतात याचा शोध घेणे गरजेचे आहे,आणि पालकमंत्र्यांनी सासोली प्रकरणात घेतलेल्या भूमिके नुसार निर्णय घ्यावा, रेशनकार्ड वरचे नांव कमी किंवा दाखल करण्यासाठी एक एक महिना कार्ड धारकांना प्रतिक्षेत ठेवणारा महसूल विभागाकडून शेकडो एकर जमीनीचा खरेदीचा व्यवहार एका दिवसात होतोच कसा ? हे कशाचे द्योतक ?तसेच सासोली जमीन गैरव्यवहार प्रकरणी ज्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी या व्यवहारात हस्तक्षेप करून महाभ्रष्ट कारभार केला त्या प्रकरणाची ईडी मार्फत सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी,तसेच सासोलीतील जमीनीची झालेली विक्री तात्काळ रद्द करून मूळ स्थितीत आणावी या मागणीसाठी संदेश पारकर यांनी २४ सप्टेंबर रोजी दोडामार्ग तहसिलदार यांच्या कार्यालय येथे पुकारलेल्या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस एसपी पक्षाचा जाहीर पाठिंबा देत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होतील असे जिल्हाध्यक्ष श्री अमित सामंत यांनी जाहीर केले आहे,